लातूर, उस्मानाबादतील सोयाबीनवर खोडमाशीसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

औसा, जि. लातूर : यंदा सोयाबीन पिकावर मोझॅक, खोडमाशी, चक्रीभुंगा, गोगलगाय यांच्यासह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. याचा मोठा फटका उत्पादनावर होत आहे.
With scab on soybeans Outbreaks of fungal diseases
With scab on soybeans Outbreaks of fungal diseases

औसा, जि. लातूर : यंदा सोयाबीन पिकावर मोझॅक, खोडमाशी, चक्रीभुंगा, गोगलगाय यांच्यासह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. याचा मोठा फटका उत्पादनावर होत आहे. भविष्यातही या कीड रोगाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.

बागायती व कोरडवाहू या दोन्ही जमिनीसाठी सोयाबीन हे वरदान ठरले आहे. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात खरिपात हे पीक ऐंशी टक्के क्षेत्रावर घेतले जाते. मात्र मागील दशकापासून पीक पद्धतीत झालेल्या बदलामुळे आता हे पीक धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. यंदा सोयाबीन लहान असताना कधी नव्हे एवढा गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला. शेकडो एकरावरचे कोवळे पीक या गोगलगायांनी फस्त करून टाकले. त्याच बरोबर वाढीच्या अवस्थेत खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे झाडे सुकून गेली. तर काही शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत मरत आहेत. 

दरम्यान, काही ठिकाणी मोझॅकच्या प्रादुर्भावाने झाडे वांझ निपजली. शेंगावर आणि पानांवर करपा (हाळद्या) रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अवेळी पाने पिवळी पडून गळून गेली. तर, शेंगांना बुरशी लागली. या बाबत मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप देशमुख यांनी केलेल्या अभ्यासानुसार सोयाबीन पिकांच्या वाढत्या अडचणींवर काही मुद्दे मांडले आहेत.

अडचणींवर काही मुद्दे 

सोयाबीन-हरभरा पिकाची सतत पेरणी, यामुळे हानिकारक बुरशींचा जमिनीत वाढता शिरकाव, खोडमाशी, चक्रीभुंग्याचे वेळेत नियंत्रण न केल्याने उत्पादनात प्रचंड घट, पीकवाढीच्या कालावधीत दरवर्षी पावसाचा पडणारा खंड. याच कालावधीत शेतकऱ्यांचे पिकाकडे होणारे दुर्लक्ष.

तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय

पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेपासून कृषी विद्यापीठांच्या शिफारसींनुसार कीडनाशकांचा वापर वेळेवर करावा. सतत एकच पीक न घेता फेरपालट करावी.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com