agriculture news in Marathi, scarcity of exportable Banana, Maharashtra | Agrowon

निर्यातक्षम केळीचा देशभरात जाणवतोय मोठा तुटवडा
चंद्रकांत जाधव
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

खानदेशातील केळीची निर्यात जूनमध्येच बंद झाली. जळगाव जिल्ह्यात निर्यातीसंबंधीची केळी आता पुढील मार्चमध्येच उपलब्ध होईल. सध्या फक्त अकलूज (जि. सोलापूर) येथून केळी निर्यात सुरू आहे. निर्यातक्षम केळी उपलब्ध होत नसल्याने निर्यातीच्या केळीचे दर १५०० रुपयांपर्यंत आहेत. देशातून सध्या फक्त थेणी (तमीळनाडू) व गुजरात येथून काही प्रमाणात केळीची पाठवणूक आखातात सुरू आहे. 
- प्रेमानंद महाजन, महाजन बनाना एक्‍सपोर्ट, तांदलवाडी (जि. जळगाव)

जळगाव ः केळीचे आगार म्हणून देशभर ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातून केळीची परदेशातील निर्यात बंद झाली आहे. राज्यातून मार्च २०१९ ते जून या दरम्यान १३०० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातात झाली आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा वाटा सुमारे ७५० कंटेनर एवढा आहे. 

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर व यावल या भागांतून मार्च ते जूनदरम्यान केळीची निर्यात सुरू होती. जूननंतर निर्यातदार कंपन्यांनी कार्यवाही बंद केली. निर्यातीच्या केळीला १२०० व कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील निर्यात ३०० कंटेनरने वाढली आहे. तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथून २७५ कंटेनर केळी निर्यात झाली. 

रावेर, मुक्ताईनगर, यावलसह नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात निर्यातक्षम केळीची काढणी पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात पुढे मार्चमध्ये निर्यातक्षम केळी काढणीसाठी उपलब्ध होईल. यातच सध्या देशभरात निर्यातक्षम केळीचा तुटवडा आहे. फक्त तमीळनाडूनमधील थेणी येथून प्रतिदिन नऊ कंटेनरची निर्यात परदेशात सध्या सुरू आहे.

आंध्र प्रदेशातील केळीची निर्यात जानेवारी, २०१९ मध्येच बंद झाली होती. तेथून जानेवारीतच निर्यातक्षम केळी काढणीसाठी उपलब्ध होईल. राज्यात सध्या फक्त अकलूज (जि. सोलापूर) येथून केळीची परदेशात निर्यात होत असून, प्रतिदिन सरासरी तीन कंटेनरची पाठवणूक तेथून तीन निर्यातदार कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे. 

गुजरातमधील कामरेज येथूनही केळीची अल्प निर्यात सुरू असून, प्रतिदिन एक कंटेनरची पाठवणूक तेथून आखातात सुरू आहे. तर मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात केळी काढणीसाठी उपलब्ध असली तरी तेथे निर्यातक्षम केळी उपलब्ध होत नसल्याची माहिती जाणकारांनी दिली. देशातून सध्या प्रतिदिन सुमारे १४ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे. निर्यातक्षम केळीचा तुटवडा असल्याने निर्यातीच्या केळीचे दर महिनाभरात वधारून १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. 
 

इतर अॅग्रो विशेष
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...