पुणे विभागात टंचाईच्या दाहकते वाढ

पुणे विभागात टंचाईच्या दाहकते वाढ
पुणे विभागात टंचाईच्या दाहकते वाढ

पुणे : विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या चार जिल्ह्यांच्या ४५ पैकी ३४ तालुक्यांमधील ५०६ गावे ३ हजार ३६२ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल ५८४ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त भागातील सुमारे ११ लाख लोकसंख्या आणि १ लाख ३२ हजार जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी २४५ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

पुण्यातील ११ तालुक्यांमध्ये टंचाई पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईने सातत्याने वाढत आहे. पाण्याबरोबरच चाराटंचाईही भासू लागण्याने चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांमधील ६१ गावे ६३८ वाड्यांमध्ये टंचाई असून, १ लाख ८५ हजार लोकसंख्येला १०२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बारामती, शिरूर तालुक्यात सर्वाधिक झळा बसत आहेत. 

साताऱ्यात पाणीटंचाईची  पशुधनालाही झळ सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव, फलटण आणि कोरेगावसह वाई, खंडाळा, पाटण या सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील १३८ गावे ६४३ वाड्यांमध्ये १५४ टॅंकर सुरू आहेत. माण तालुक्यात पाणीटंचाई सर्वाधिक टंचाई असून ६६ गावे, ५२४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ९१ टॅंकर सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील सुमारे २ लाख ३५ हजार लोकसंख्येसह जवळपास ८५ हजार जनावरांच्या पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. 

जत, आटपाडीत तीव्रता वाढली सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यात टंचाईच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. जत, आटपाडी, तासगाव, मिरज, खानापूर या सांगलीच्या पाच तालुक्यांतील १५४ गावे ९८४ वाड्यांमधील सुमारे ३ लाख ३४ हजारांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५९ टॅंकर धावत आहेत. यात जतमधील ८१ गावे ६०९ वाड्यांना आणि आटपाडीमधील २६ गावे २०६ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणी दिले जाते. आटपाडीतील सुमारे ३८ हजार जनावरांना पिण्यासाठी टॅंकरने पाणी पुरविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

सोलापूरमध्ये टंचाईचा विळखा घट्ट उन्हाचा चटका वाढू लागताच पंढरपूर तालुका वगळता उर्वरित सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढल्याने १५३ गावे, १ हजार ९७ वाड्यांमधील ३ लाख २७ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी १६९ टॅंकर सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती
तालुके गावे वाड्या टॅंकर
पुणे ६१ ६३८ १०२
सातारा १३८ ६४१ १५४
सांगली १५४ ९८४ १५९
सोलापूर १५३ १०९७ १६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com