पुरंदर, बारामतीमध्ये पाणी टंचाई वाढली

पुरंदर, बारामतीमध्ये टंचाई वाढली
पुरंदर, बारामतीमध्ये टंचाई वाढली

पुणे : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात जोरदार पाऊस झाल्याने धरणे ओसंडून वाहत आहेत. तर पूर्व भागातील बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यांत मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. कोरडवाहू भागातील भूजलपातळीत अद्यापही समाधानकारक वाढ न झाल्याने सप्टेंबर महिन्यातच बारामती, पुरंदर तालुक्यांत टंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील ४० गावे ३२४ वाड्यांमधील एक लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागविण्यासाठी ५० टॅंकर सुरू आहेत.

मॉन्सूनच्या पावसाने पूर्व भागात पुरेशी हजेरी लावलेली नसल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले. जून २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल साडेतीनशेहून अधिक टॅंकरच्या मदतीने लाखो नागरिकांची तहान भागविली जात होती. त्यानंतर पावसाला सुरवात झाली आणि टॅंकरची संख्या झपाट्याने कमी झाली. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १२ तालुक्‍यांपैकी ७ तालुके टॅंकरमुक्त झाले. मावळ तालुक्‍यात टॅंकर सुरू करण्याची वेळच आली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि आंबेगाव या पाच तालुक्‍यांत टॅंकर सुरू आहेत. 

टंचाईग्रस्त तालुक्‍यांमध्ये अजूनही पाऊस झाला नाही. पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे असून, भूजलपातळीतही वाढ झालेली नाही. परिणामी वस्ती भागावरील शेतकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली. त्यामुळे या गावातील टॅंकर सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांकडून येत आहे. मागील १५ दिवसांमध्ये तीन गावे आणि ४१ वाड्या-वस्त्यांवरील १७ हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुरंदरमध्ये ५ तर बारामतीमध्ये २ टॅंकर वाढविण्यात आले आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात १५, पुरंदर तालुक्यात ११, इंदापूरमध्ये १४, दौंडमध्ये ९ आणि आंबेगावमध्ये १ असे एकूण ५० टॅंकर सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

जिल्ह्यातील तालुकानिहाय टंचाईची स्थिती
तालुका गावे वाड्या टॅंकर
बारामती १५ १४५ १५
इंदापूर १२ ५८ १४
पुरंदर ६४ ११
दौंड ५०
आंबेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com