agriculture news in Marathi scarcity of onion seed in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कांदा बियाण्याची टंचाई

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे पुरेशा क्षमतेने कांदा बीजोत्पादन झाले नाही. परिणामी यंदा गावरान कांदा बियाण्याचा तुटवडा असून दर दुप्पट झाले आहेत. 

नगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे पुरेशा क्षमतेने कांदा बीजोत्पादन झाले नाही. परिणामी यंदा गावरान कांदा बियाण्याचा तुटवडा असून दर दुप्पट झाले आहेत. जास्त दर देऊनही कांदा बियाणे मिळेनासे झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यानेही कांदा बियाणे पुरवठा होत नसल्याचे विक्रेते सांगतात. शेतकऱ्यांकडेही यंदा बियाणे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा कांदा उत्पादन महागडे होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 नगर जिल्ह्यात खरीप, लेट खरीप व उन्हाळी कांद्याची साधारण दरवर्षी ७० ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असते. गेल्यावर्षी कांद्याला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे लागवडी वाढल्या. गतवर्षी एकट्या नगर जिल्ह्यात सुमारे एक लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती. लेट खरीप आणि रांगडा कांद्याची लागवड सध्या सुरु आहे. नगर जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांना औरंगाबाद, नाशिक, पुणे, जालना भागातून कंपन्या कांदा बियाणे पुरवतात. गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा जोर, सततचे बदलते वातावरण यामुळे बीजोत्पादन साधले नाही.

परिणामी यंदा कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.बियाणे तुटवड्यामुळे गेल्यावर्षी साधारण १९५० ते २००० रुपये किलोने मिळणाऱ्या गावरान बियाण्यासाठी यंदा ३६०० रुपये मोजावे लागत आहेत. दीड हजार रुपये किलोने मिळणारा रांगडा कांदा यंदा २२०० ते २४०० रुपये झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी कांदा बीजोत्पादन घेऊन बियाणे विकतात. दरवर्षी सहा ते सात हजार रुपये पायली असलेली कांदा बियाणे यंदा १० ते १२ हजार रुपये पायली झाले आहेत. विशेष म्हणजे दुप्पट दर देऊनही कांदा बियाणे मिळेनासे झाले आहे. मागणी आहे, परंतु पुरवठा होत नसल्याचे विक्रेते शिवराज कापरे यांनी सांगितले.

रोपांचेही होतेय नुकसान
साधारण जून ते जुलैमध्ये रोपे टाकून लेट खरिपात गावरान कांद्याची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे सध्या लावणीला आलेल्या रोपांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपलब्ध रोपांपैकी पन्नास टक्के रोपे पावसामुळे वाया जात आहेत. याचा कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी अतुल तांबे यांनी व्यक्त केली.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...