सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाई कायम

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाई कायम
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाई कायम

सातारा ः जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले असतानाही पूर्व भागात मात्र पाण्याची टंचाई कायम आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यातील ८८ गावे ६३२ वाड्या-वस्त्यांवर ११० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीस पावसाच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील अनेक गावात महापूर आले. या पुरामुळे कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागले आहे. या भागातील अनेक तालुक्यातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, याउलट पूर्वेकडील माण, खटाव व फलटण तालुक्यातील परिस्थिती आहे. 

या तिन्ही तालुक्यांत अपुऱ्या पर्जन्यामानामुळे पिण्याची पाण्याची टंचाई कायम असल्याने शेतातील पिके तर करपू लागली आहेत. 

जिल्ह्याच्या दोन्ही टोकास विरोधी परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्‍चिमेकडे अतिवृष्टीने तर पूर्व भागात दुष्काळामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान सुरू आहे. माण, खटाव व फलटण या तीन तालुक्यातील ८८ गावे ६३२ वाड्यावस्त्यावरील एक लाख ५१ हजार १०३ लोकांना ११० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यातील ७६ गावे ५७४ वाड्यावस्त्यावरील एक लाख ४० हजार २३२ लोकांना १०५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

खटाव तालुक्यातील नऊ गावे ४० वाड्यावस्त्यांवरील ६८११ लोकांना तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील तीन गावे व १८ वाड्यावस्त्यांवरील ३९८८ लोकांना दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पावसाने सगळीकडे उघडीप असून सर्वत्र पडत आहे. टँकर सुरू असलेल्या गावात पाऊस नसल्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. संरक्षित पाण्यासाठी ३८ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून यामध्ये माण तालुक्यात ३१ तर खटाव सहा व फलटण एका विहिराचा समावेश आहे. या टंचाई फटका जनावरांनाही बसत आहे. सध्या या तीन तालक्यातील ७४ हजार ४२५ बाधित आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com