agriculture news in marathi, scattered rain fall prediction for Central Maharashtra and Marathwada | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट कायम आहे. रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता अाहे. तर मंगळवारी आणि बुधवारी विदर्भात हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ हवमानामुळे दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली.

पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट कायम आहे. रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता अाहे. तर मंगळवारी आणि बुधवारी विदर्भात हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ हवमानामुळे दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. शनिवारी दुपारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कोल्हापूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाची नोंद झाली आहे. ढगाळ हवामानामुळे कोकण वगळता राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या ५ अंशांपेक्षा अधिक घट झाली होती. परभणी येथे दिवसाचे तापमानात सरासरीपेक्षा तब्बल १४.५ अशांनी घसरले होते. तर ब्रह्मपुरी, चंद्रपुरात १२.७ अंश, गोंदियामध्ये १० अंशांची घट झाली होती. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, वर्धा येथे शुक्रवारचा दिवस थंड होता. पुढील दोन दिवसांत दिवसाच्या तापमानात पुन्हा घट होणार अाहे.  

शनिवारी (ता. १७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात तापमानात सरासीच्या तुलनेत झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.२ (-७.२), नगर ३१.० (-४.९), जळगाव ३६.६ (- ०.९), कोल्हापूर २९.३ (-६.५), महाबळेश्वर २६.८ (-३.२), मालेगाव ३६.४ (०.२), नाशिक ३३.० (-२.१), सांगली २९.४ (-७.२), सातारा ३१.० (-३.५), सोलापूर ३०.१ (-७.३), मुंबई ३३.० (१.६), अलिबाग ३०.४ (-०.३), रत्नागिरी ३५.६ (४.०), डहाणू ३१.४ (०.८), भिरा ३४.० (-४.१), औरंगाबाद २९.४ (-६.०), परभणी २२.५ (-१४.५), अकोला ३२.५ (-४.४), अमरावती २९.२ (-७.३), बुलडाणा २८.५ (-५.३), ब्रह्मपुरी २३.२ (-१२.७), चंद्रपूर २५.२ (-१२.७), गोंदिया २५.४ (-१०.०), नागपूर २७.६ (-८.३), वर्धा २९.० (-६.७), यवतमाळ ३१.० (-४.८).

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...