agriculture news in marathi, scattered rain prediction in konkan and central maharashtra | Page 3 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पुणे : परतीच्या पावसाची चाहूल लागली असताना वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान ढगाळ होत आहे. तसेच, उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. आज (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर येथे सर्वाधिक ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फ सांगण्यात आले. 

पुणे : परतीच्या पावसाची चाहूल लागली असताना वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान ढगाळ होत आहे. तसेच, उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. आज (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर येथे सर्वाधिक ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फ सांगण्यात आले. 

मध्य प्रदेश आणि परिसरात व उत्तर प्रदेशातील काही भाग, बिहार झारखंड आणि छत्तीसगडच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर तमिळनाडूमध्येही चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, त्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत सकाळपासून तापमान आणि उकाड्यात वाढ होत आहे.

कोकणात कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर मध्य महाराष्ट्रात २४ ते ३२ या दरम्यान कमाल तापमान होते. जळगावमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली होती. मराठवड्यातही ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. विदर्भातही अमरावती, चंद्रूपर, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली होती. तर अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा येथील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३०.९ (०.४), नगर ३२.२ (०.८), लोहगाव ३२.६ (१.३), जळगाव ३२.६ (-२.१), कोल्हापूर ३१.७ (१.६), महाबळेश्वर २४.२ (०.४), मालेगाव ३२.८ (०.३), नाशिक ३०.४ (०.७), सांगली ३१.८ (०.६), सातारा ३१.८ (२.५), सोलापूर ३३.८ (१.४), मुंबई ३२.५ (१.३), अलिबाग ३१.८ (१.०), रत्नागिरी ३२.५ (२.३), डहाणू ३१.७ (०.२), औरंगाबाद ३१.६ (०.२), परभणी ३३.० (०.३), नांदेड ३३.० (-०.२), अकोला ३३.४, अमरावती ३२.४ (-१.२), बुलढाणा ३०.५ (०.१), चंद्रपूर ३३.२ (-०.२), गोंदिया ३१.५ (-१.५), नागपूर ३३.१ (-०.२), वाशीम ३२.४, वर्धा ३२.० (०.७), यवतमाळ ३१.० (-१.२)


इतर अॅग्रो विशेष
गोकूळ दूध संघाकडून खरेदी दरात वाढकोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍...
थंडीत चढ-उतार पुणे ः राज्यातील अनेक भागात थंडी किंचित कमी झाली...
कृषी अभ्यासक्रमात रोबोटिक्सपुणे ः आर्टिफिशियल इंटेलिजिंट अर्थात कृत्रिम...
थेट सरपंच निवड रद्द करणार: हसन मुश्रीफ मुंबई : फडणवीस सरकारने सुरू केलेली थेट सरपंच निवड...
‘उजनी'च्या पाण्याने जमिनीच्या...सोलापूर  : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
नागपुरी संत्र्याची होणार दुबईला निर्यातअमरावती : शासन, प्रशासन आणि संस्थात्मकस्तरावर...
पीकविम्याच्या फसवणूक प्रकरणी...आर्णी, जि. यवतमाळ ः सायबर कॅफे संचालकाने...
देशभरातील शेतकरी संघटना एकवटणार ः राजू...मुंबई : देशभरातील २६५ शेतकरी संघटनांच्या अखिल...
‘गुगलेश्वरा’मुळे कृषी विद्यार्थी...पुणे: “आम्ही कृषी शिक्षण घेताना शिक्षक आणि...
ग्रामपंचायत स्तरावर हवे ‘मॉईश्‍चर’ मीटरनागपूर : अधिक ओलाव्याच्या कापसाला प्रती एक टक्‍क्...
वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभसांगली ः द्राक्ष बागायतदारांवर निसर्गाच्या...
नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा लागवडींना...नाशिक : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
कापसाचे दर ५१०० वर जळगावः कापसाचे उत्पादन घटल्याचा अंदाज आणि...
पुण्यात १७ जानेवारीला राष्ट्रीय कृषी...पुणे: फळे, फुले, भाजीपाला निर्यातीला चालना...
मराठवाडा, विदर्भात थंडी कायमपुणे ः विदर्भातील काही भागांत असलेली थंडीच्या...
निर्यात साखर अनुदानाचे एक हजार कोटी...मुंबई: केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना...
कृषी निर्यातीसाठी जिल्हानिहाय केंद्रपुणे : देशाच्या कृषी निर्यातीचे मार्ग बळकट...