agriculture news in marathi scattered rain prediction in Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

आज (बुधवारी) पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

पुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होईल. आज (बुधवारी) पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच बंगालच्या उपसागर परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती दोन दिवसांत उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार असून आॅक्टोबर हिटचा चटकाही वाढण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढउतार होत आहे. उद्या (गुरूवारी) रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सोलापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. शुक्रवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार असला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडले. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील. शनिवारी (ता. २४) अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात काहीसा पाऊस पडणा असून इतर भागात उघडीप राहणार आहे. 


इतर बातम्या
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...
खत विक्रीत वाढपुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन...