agriculture news in marathi, scattered rainfall prediction in state | Page 2 ||| Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. तर तापमान चाळीशीपार गेल्याने सोलापूर, परभणी, अमरावती चांगलेच तापले आहे. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. तर तापमान चाळीशीपार गेल्याने सोलापूर, परभणी, अमरावती चांगलेच तापले आहे. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २५) मराठवाड्यातील नांदेड, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, त्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. 

 तर दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागात असलेल्या अनंतपूर येथे देशातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रातील सोलापूर येथे ४०.७, अमरावती ४०.६ आणि परभणी येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. जळगाव, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. 

रविवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : नगर ३८.२ (१.९), धुळे ३८.०, जळगाव ३९.० (०.४), कोल्हापूर ३७.८ (१.५), महाबळेश्वर ३३.४ (२.२), नाशिक ३६.६, पुणे ३७.६(१.४), सातारा ३७.८ (१.६), सोलापूर ४०.७ (२.१), आलिबाग ३१.० (-०.१), डहाणू ३१.० (-०.४), सांताक्रूझ ३४.१ (१.३), रत्नागिरी ३३.० (१.२), औरंगाबाद ३७.८ (१.२), उस्मानाबाद ३८.६, परभणी ४०.२ (२.०), अकोला ३९.५ (०.९), अमरावती ४०.६ (२.८), बुलडाणा ३६.० (०.९), बह्मपुरी ३९.२ (१.५), चंद्रपूर ३९.४ (०.५), गोंदिया ३४.६ (-२.८), नागपूर ३७.५ (-०.१), वर्धा ३९.४ (१.६), वाशीम ३७.६, यवतमाळ ३९.० (१.९).

इतर अॅग्रो विशेष
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...