तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता
तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

पुणे : राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर उन्हाचा चटकाही वाढल्याने यंदाच्या हंगामात राज्यात प्रथमच तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे. शुक्रवारी (ता.१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उद्यापासून (ता.३) राज्यात मुख्यतः उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्यप्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, रायलसिमा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडत असून, आज (ता.२) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.

राज्याच्या विविध भागात उन्हाचा चटका पुन्हा तापदायक ठरू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोल्यासह वाशीम येथे तापमान ४३ अंशापुढे गेले असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही असह्य होत आहे. पूर्वमोसमी पावसाचे ढग असलेल्या भागात मात्र तापमान चाळिशीच्या खाली आहे. पुढील काळात उन्हाचा चटका आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.७, जळगाव ४३.२, धुळे ४३.४, कोल्हापूर ३४.८, महाबळेश्‍वर ३०.५, मालेगाव ४२.६, नाशिक ३७.५, निफाड ३९.०, सांगली ३७.६, सातारा ३८.६, सोलापूर ४१.३, डहाणू ३४.९, सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३४.७, औरंगाबाद ४०.४, परभणी ४३.५, नांदेड ३७.५, अकोला ४४.३, अमरावती ३८.८, बुलडाणा ४१.३, ब्रह्मपुरी ४१.९, चंद्रपूर ४१.५, गोंदिया ३९.४, नागपूर ४१.३, वाशीम ४३.०, वर्धा ४१.०. कमी दाब क्षेत्राची निर्मिती बंगालच्या उपसागरात दक्षिण भागात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता.१) दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. रविवारपर्यंत (ता.३) हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com