साताऱ्याच्या बाजारात दरवळला झेंडूचा सुगंध

पावसाने खरिपातील पिकांवर पाणी फिरवल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले. मात्र झेंडूच्या सुगंधाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कधी नव्हे ते जिल्ह्यातील झेंडूच्या बागांवर व्यापाऱ्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, झेंडूस ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे जागेवर दर मिळत आहे.
The scent of marigold permeates the market in Satara
The scent of marigold permeates the market in Satara

सातारा ः पावसाने खरिपातील पिकांवर पाणी फिरवल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले. मात्र झेंडूच्या सुगंधाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कधी नव्हे ते जिल्ह्यातील झेंडूच्या बागांवर व्यापाऱ्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, झेंडूस ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे जागेवर दर मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात फुलशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये झेंडू, निशिगंध, गुलाब, गलाडा आदी फुलांचा समावेश आहे. काही शेतकरी माडी तसेच काही ठिकाणी आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली जाते. खासकरून आले पिकांत मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली जाते. या वर्षीही जिल्ह्यात साधारणपणे ३०० हेक्टरवर झेंडूची लागवड झाल्याचा अंदाज आहे.

दसरा, दिवाळी दर चांगला राहील या अंदाजावर ही लागवड केली जाते. परतीच्या पावसाने थैमान घातल्याने दसरा सणाच्या तोंडावर झेंडूचेही मोठे नुकसान झाले होते. नंतरच्या काळात पाऊस गेल्याने झेंडूच्या बागा सेट झाल्या आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन तसेच पाडव्याला झेंडूचे फुले मोठ्या प्रमाणात लागत असल्याने दरातही तेजी आली आहे. कोरोनाबाधितांचे आकडे कमी होत असल्याने लोकांची खरेदी वाढली असल्याने दिवाळी चांगली साजरी होणार असल्याने झेंडूचे दर अधिक वाढण्याची शक्यता आहे. ही बाब ओळखून कधी नव्हे ते व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर दिसू लागले आहेत. परतीच्या पावसामुळे बागा गेल्या असल्यामुळे फुलांची टंचाई भासणार असल्याने झेंडूचे प्लॉटचे प्लॅाट बुक केले जात आहेत.

मागील तीन दिवसांपासून जागेवर (कोणत्याही वाहतुकीशिवाय) ८० ते ९० रुपये किलो प्रमाणे दर ठरविले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. लक्ष्मीपूजन व पाडव्याला अजून दर वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माझा दहा गुंठे क्षेत्रावर झेंडूची प्लॅाट आहे. दसरा सणाच्यावेळी मला किलोला शंभर रुपये दर मिळाला होता. दोन दिवसांपूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांकडून ८० रुपये किलोने सर्व प्लॅाट बुक केला आहे. -प्रवीण काटे, प्रगतशील शेतकरी आवर्डे, ता. पाटण, जि. सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com