agriculture news in marathi, schedule change of mahajanadesh yatara, akola, maharashtra | Agrowon

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत बदल
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (ता. २४) निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आली. आता पूर्वनियोजनानुसार सोमवारपासून (ता. २६) ही यात्रा पुन्हा सुरू होईल. 

अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (ता. २४) निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आली. आता पूर्वनियोजनानुसार सोमवारपासून (ता. २६) ही यात्रा पुन्हा सुरू होईल. 

शनिवारी बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार होत्या. मलकापूर येथे सभास्थळी उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अरुण जेटली यांना आदरांजली वाहत सभा रद्द केल्याची घोषणा केली. यापूर्वी सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे ७ आॅगस्टला बुलडाणा जिल्ह्यात नियोजित सभा रद्द करण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्यांदा या जिल्ह्यातील महाजनादेश यात्रा रद्द केली गेली आहे.

दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात तीन सभा होत्या. शनिवारी मलकापूर येथे पहिली सभा आयोजित होती. या सभेपूर्वीच अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे वृत्त आले. मुख्यमंत्र्यांचे दुपारी दोन वाजता जनता विद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. माध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सभेच्या ठिकाणी हजर राहत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करीत महाजनादेश यात्रा स्थगित केल्याचे स्पष्ट केले. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री डॉ. संजय कुटे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, चैनसुख संचेती, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...