नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन, कुक्कुटपालन योजनेचा लाभ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना शेळी, कुक्कुटपालन योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यातील १८७ शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे.

शेतीला पूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी करावा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन पशुसंवर्धन विभागामार्फत सर्वसाधारण, विशेष घटक योजना व आदीवासी विभागातून शेळीपालन, कुक्कटपालन, गाय योजनेचा अनुदानावर लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ah.mahabms.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी अर्ज भरताना मोबाईल क्रमांक टाकणे आवश्‍यक असून, त्या क्रमांकावर माहिती कळवली जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना टाकण्यात आलेला मोबाईल क्रमांक बदलू नये. जिल्ह्यातील १८७ शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कटपालनचा लाभ दिला जाणार आहे. त्यात शेळीपालनासाठी १३४, तर कुक्कुटपालनासाठी ५३ लाभार्थी असतील. त्यात ३३ लाभार्थी आदिवासी विभागातील असतील. या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भांगरे, राहुल कांबळे यांनी केले आहे.  

तालुकानिहाय शेळीपालन लाभ, कंसात कुक्कुटपालन ः नगर : ११ (५), पारनेर :  ८ (४), पाथर्डी :  ७ (३), संगमनेर : १० (४), अकोले : २९ (१०), कोपरगाव : ७ (२), श्रीरामपूर :  ७ (३), राहुरी :  ९ (४), शेवगाव : ५ (३), नेवासा : १० (४), कर्जत : ७ (२), जामखेड : ४ (२), श्रीगोंदा : ९ (४), राहाता : ८ (३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com