योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्‍न कायम का?

जगण्यासाठी अन्नधान्य ते पिकविण्यासाठी शेती, त्या शेतीतील मातीचे आरोग्य टिकविण्यासाठी शेणखत, शेणखतासाठी जनावरं व जनावरं जगविण्यासाठी चारा आवश्‍यक, हे वर्तुळ समजून घेऊन काम करावे लागेल. योजना व निधीची कमतरता नाही, संवादातून निर्माण झालेली दरी दूर करता येईल. - गणेश देशपांडे, उपसंचालक, वैरण विकास पाणी संरक्षणाऐवजी माती संरक्षणावर भर हवा. माती संरक्षणामुळे पाणी मिळेल. वातावरण बदलाला पूरक शेतीपद्धती शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांपुढे मांडणी केल्यास ते त्याचा स्वीकार करतील. - विजयअण्णा बोराडे, विश्वस्त, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ.
Scheme, no shortage of funds, then why the question of agriculture remains: the question of savvy
Scheme, no shortage of funds, then why the question of agriculture remains: the question of savvy

औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा, अंमलबजावणीही, मग तरीही शेतीसमोरील वर्षानुवर्षाचे प्रश्न कायम का? असा प्रश्न औरंगाबाद येथे २० आणि २१ नोव्हेंबरला ‘कोरडवाहू क्षेत्र व इतर प्रश्न’ या विषयावर पार पडलेल्या चर्चासत्रातून पुढे आला.  शासनाचे धोरण, अंमलबजावणी व प्रत्यक्ष स्थिती यामध्ये असलेली ‘दरी’ व निर्माण होण्याची कारणे व ती ‘दरी’ दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची ‘जंत्री’ या चर्चासत्रातून पुढे करण्यात आली. 

रिव्हायटलाइझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर नेटवर्क (आर.आर. ए), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय कार्यालय औरंगाबाद व एमजीएम कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्‍त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या अभ्यासकांसह तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, शेतकरी, पशुपालक आदींनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला. 

बुधवारी (ता. २०) झालेल्या पहिल्या सत्रात वायआरए नागपूरचे अजय पराडकर यांनी संरक्षित सिंचन, मनीष राजनकर यांनी मत्स्य व्यवसाय शासनाची धोरणे आणि प्रत्यक्ष स्थिती, कौस्तुभ पांढरीपांडे यांनी चराई धोरण गवत संरक्षण, जैवविविधतेवरील परिणाम, अश्विनी कुलकर्णी यांनी बदलता पिक पॅटर्न आकडेवारीचा खेळ आणि त्याची उत्पादकतेशी सांगड, मिलिंद वाटवे यांनी वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे पीक पद्धतीवरील परिणाम, प्रवीण भुते यांनी वन हक्‍काचे पट्टे वनजमीन विकास याविषयीचे सादरीकरण केले. त्यानंतर या प्रत्येक विषयाशी संबंधित अभ्यासक, शेतकरी, पशुपालक, तज्ज्ञ व जाणकारांच्या बुधवारी व गुरुवारी (ता. २१) गटचर्चा झाल्या. त्यातून समोर आलेल्या सूचनांची ''पोझिशन पेपर'' रूपात मांडणी करण्यात आली. या सत्राला कृषिरत्न विजयअण्णा बोराडे व वैरण विकासचे उपसंचालक गणेश देशपांडे यांची उपस्थिती होती. 

कोरडवाहू क्षेत्र व त्याअनुषंगाने उपस्थित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची मांडणीही अभ्यासक व जाणकारांनी या वेळी केली. प्रतिनिधींनी सुचविलेल्या मुद्यांना शासनाच्या धोरण कक्षेत अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने मूर्त रूप देण्यात येणार आहे. आर. आर. ए. च्या माध्यमातून फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले जाईल, असे आर.आर.ए. चे समन्वयक सजल कुलकर्णी यांनी सांगितले. 

चर्चासत्रातून पुढे आलेल्या महत्त्वाच्या बाबी

  •     जिओ हायड्रोलॉजिकल अभ्यास प्रत्येक भागात      व्हावा.
  •     दुष्काळी शेतीसाठी स्वतंत्र धोरण हवे.
  •     जुन्या पायाभूत सुविधांचे व्हावे पुनरुज्जीवन
  •     मत्स्य व्यवसायासाठी निश्‍चित धोरण असावे 
  •     वारेमाप होणारा वाळू उपसा गंभीर 
  •     गवताळ भागावरील जैवविविधता नष्ट होणे            गंभीर 
  •     चारायुक्‍त शिवार अभियान राबविण्याची गरज.
  •     जैवविविधता कायदा व मंडळ सक्षमपणे पुढे          येण्याची गरज
  •     चाऱ्यासाठी विभाग स्तरावर हवे तृण संशोधन        केंद्र
  •     पारंपरिक वाणांना प्रोत्साहनाची योजना हवी. 
  •     हवामान बदलाला अनुकूल पीकपद्धती हवी
  •     वैशिष्ट्यपूर्ण वाणांना मिळावा हमीभाव.
  •     पारंपरिक व सुधारीत वाणाची विद्यापीठांनी            तुलनात्मक अभ्यास करून करावी मांडणी
  •     वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे दावे                  करण्याची पद्धत व्हावी सुलभ  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com