यवतमाळ जिल्ह्यात डझनभर योजनाही आत्महत्या रोखण्यात अपयशी

गेल्या वीस वर्षांत शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी डझनावर योजना अस्तित्वात आल्या. अनेक कृषी तज्ज्ञांनी ''सिंचन, हमीभाव, बाजारपेठ'' असल्याशिवाय तोडगा नसल्याचे मत व्यक्त केले.
यवतमाळ जिल्ह्यात डझनभर योजनाही आत्महत्या रोखण्यात अपयशी
यवतमाळ जिल्ह्यात डझनभर योजनाही आत्महत्या रोखण्यात अपयशी

यवतमाळ: गेल्या वीस वर्षांत शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी डझनावर योजना अस्तित्वात आल्या. अनेक कृषी तज्ज्ञांनी ''सिंचन, हमीभाव, बाजारपेठ'' असल्याशिवाय तोडगा नसल्याचे मत व्यक्त केले. अभ्यासकांचाही कल असाच राहिला. मात्र, याबाबीचे भांडवल करीत शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्‍य, व्यसन, कौटुंबिक समस्या यावर मत-मतांतरे झाली. तरीसुद्धा आत्महत्या न थांबल्याने या योजनांचे फलित काय? असा प्रश्‍न आता कृषी तज्ज्ञांसह शेतकऱ्यांनाही पडला आहे. जिल्ह्याला लागलेले शेतकरी आत्महत्येचे ग्रहण कोरोनाच्या संसर्गातही संपलेले नाही. बळिराजा चेतना अभियान, मोतीराम लहाने कृषी संजीवनी योजना, नानाजी देशमुख कृषी समन्वित प्रकल्प, आत्मा, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, बळीराज जलसिंचन योजना, सौरपंप योजना, पांडुरंग फुंडकर फळबाग योजना अशा अनेक योजना गेल्या वीस वर्षांत आल्या आणि बंद झाल्या आहेत. यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. प्रत्यक्षात ज्या उद्देशांसाठी या योजना सुरु करण्यात आल्या होत्या, तो उद्देश किती टक्के यशस्वी झाला हे एक कोडेच आहे. शेतकरी आत्महत्येवर जिल्ह्यात नेत्यांपासून तर अभिनेत्यापर्यंत, आध्यामिक गुरूपासून तर योगगुरुपर्यंत अनेकांनी भेटी दिल्या आहेत. रॅली, यात्रा, जनजागृती असे उपक्रम सामाजिक संघटनांपासून तर शासनापर्यंत अनेकांनी राबविले. याचा मोठा गाजावाजा झाला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेले सिंचन, हमीभाव व बाजारपेठ याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेले नाहीत.  शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाचे पंतप्रधान पॅकेज, कर्जमाफी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा फुले शेतकरी योजना राबविण्यात आल्या. प्रत्यक्षात यानंतरही शेतकरी आत्महत्येचे शापीत चक्र थांबलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर राहुल गांधीपर्यंत अनेकांच्या भेटी जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचा हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजला. साहित्य क्षेत्रानेही यांची दखल घेतली. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे उद्‌घाटन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांनी केले. शेतकऱ्यांच्या व्यथा जगासमोर आणल्या. मात्र, शेतकऱ्यांची स्थिती अजूनही बदलेली नाही. गेल्या वीस वर्षांत योजनांच्या घोषणा, दावे कितीही झाले असले तरी प्रत्यक्षात ‘ग्राउंड रिर्पाट’ वेगळाच आहे. या काळात चार हजार ५७४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून एक हजार ७७५ पात्र, दोन हजार ६९१ अपात्र तर १०८ प्रकरणे चौकशीत आहेत. ''लॉकडाउन''मध्ये  २८ आत्महत्या संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. असे असले तरी गेल्या तीन महिन्यांत २८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मार्च महिन्यांत आठ, एप्रिलमध्ये १६ तर मे महिन्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या

७७६ २००१-०६

२२७९ २००७-१४

६५८ २०१५-१६

२४२ २०१७

२५५ २०१८

२९० २०१९

७४ २०२०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com