परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुख
नांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत तीस गावांतील शेतकऱ्यांनी विविध घटकांचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले.
नांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत तीस गावांतील शेतकऱ्यांनी विविध घटकांचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले.
या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनात ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस, फळबाग लागवड, बांबू लागवड, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, शेततळे, नाडेप कंपोस्ट, गांडूळखत आदी वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ग्रामसंजीवनी समितीच्या मंजुरीसह अर्ज करता येतात. गावातील समूह संघटक व कृषी सहायकांशी संपर्क करून वैयक्तिक लाभाची मागणी शेतकऱ्यांनी नोंदवावी.
प्रकल्पातंर्गत गावातील शेतकरी गटांनी कृषी अवजारे बँक, शेडची उभारणी या सामुदायिक घटकांसाठी २० लाख रुपयांपर्यंत प्रस्ताव सादर करता येतो. याचप्रमाणे शेतीमालावर आधारित प्रक्रिया केंद्र, गोदाम यासारखे सामूहिक घटकांसाठी प्रस्ताव दाखल करावेत. योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी ६० टक्के पासून ते ८० टक्केपर्यंत अनुदान उपलब्ध आहे.
तीस गावांचा समावेश
या योजनेत कंधार तालुक्यातील ३० गावांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात आलेगाव, औराळ, बामणी प. क., बिंडा, चौकी महाकाया, चौकी धर्मापुरी, चिखली, चिंचोली प.क., दहिकळंबा, दाताळा, गुंडा, हळदा, हिस्से औराळ, मजरे वरवंट, मजरे सांगवी, नंदनवन, सावळेश्वर, तर दुसऱ्या टप्प्यात बाचोटी, देवयाचीवाडी, गोगदरी, गोणार, जाकापूर, कल्लाळी, पेठवडज, रुई, सावरगाव नि., शिरसी बु, शिरशी खू, येलूर या गावांचा समावेश आहे.
आठ हजार अर्ज दाखल
कंधार तालुक्यातून आठ हजार १५९ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यातील तीन हजार ४८४ शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली आहे. समूह सहायक, कृषी सहायक स्तरावरून दोन हजार ९६७ लाभार्थ्यांची पडताळणी झाली आहे. दोन हजार ९२० अर्जांना विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पूर्वसंमती दिली आहे. यापैकी एक हजार १६३ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. ६२८ शेतकऱ्यांना या योजनेतून डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभ खात्यात हस्तांतरित करण्यात आला.
- 1 of 1064
- ››