दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात 

‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध सवलती देवून त्यांना वायदे बाजारात स्थान दिले.
chana price
chana price

पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध सवलती देवून त्यांना वायदे बाजारात स्थान दिले. याचा लाभ थेट शेतकऱ्यांना होत असून पेरणीआधीच दर संरक्षित करता आले. वायदे बाजार साक्षरता निर्माण होण्यासाठी अशी योजना किमान ५ ते ६ वर्ष सुरु राबवावी. सरकारने पीकविमा योजनेप्रमाणे दराचा विमा देण्याऱ्या अशा योजना राबवाव्यात. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, ‘सीएसआर’ निधी, वित्तीय संस्था यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी उत्पाक कंपन्यांनी केली आहे. 

वायदे बाजारात शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) स्थान मिळावे, त्यांना या संधीचा लाभ घेता यावा आणि पेरणीच्या वेळीच शेतकऱ्यांना आपल्या मालाचा दर संरक्षित करता यावा यासाठी ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’च्या माध्यमातून विविध सवलती देत प्रोत्साहन दिले. यात संपूर्ण प्रीमीयम माफी, ब्रोकरेज फी, वाहतूक, गुणवत्ता तपासणीसह विविध बाबींसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले होते. तसेच शेतकऱ्यांना डिलिव्हरी पूर्ण करणे किंवा त्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे ‘एनसीडीईएक्स’च्या या पहिल्याच योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभागी चांगला प्रतिसाद दिला. 

वायदे बाजारात पहिल्यांदाच सहभाग घेत असताना अनेक ‘एफपीओ’ना तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांना ‘ऑप्शन्स’ घेता आले नाहीत. परंतु या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना वायदे बाजारातील दराचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘एनसीडीईएक्स’ने आणलेल्या या उपक्रमात राजस्थानमधील सर्वाधिक ‘एफपीओ’नी सहभाग घेतला.  ‘एफपीओ’चा सहभाग (टनांत)  ४१  ‘एफपीओ’  २०००  मोहरी  १०००  हरभरा  ३०००  एकूण 

शेतकऱ्यांच्या मागण्या 

  • शेतकऱ्यांना या व्यवहाराविषयी जागृती करावी 
  • नोंदणीची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करावी 
  • तांत्रिक भाषेऐवजी स्थानिक भाषेत प्रक्रिया असावी 
  • शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मविषयी प्रशिक्षण द्यावे 
  • शेतकऱ्यांना मदत करणारी यंत्रणा असावी 
  • डिलिव्हरी ठिकाणे जवळची असावीत 
  • प्रतिक्रिया ‘एनसीडीईएक्स’ने आणलेल्या ‘पुट ऑप्शन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळीच आपल्या मालाचा दर संरक्षित करता येतो. तसेच ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे जास्तीतजास्त शेतकरी कंपन्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच इतर संस्थांनी हा उपक्रम पुढे न्यावा.  - अलिन मुखर्जी, ‘ईव्हीपी’ एनसीडीईएक्स आणि ‘सीओओ’ एनआयसीआर. 

    ‘पूट ऑप्शन’च्या माध्यमातून शेतकरी पेरणीच्या वेळीच आपल्या पिकाचा दर संरक्षित करु शकतात. वित्तीय संस्था, केंद्र सरकार, स्वयंसेवी संस्था, राज्य सरकार, ‘सीएसआर’च्या माध्यमातून अशा योजनांना प्रोत्साहन मिळावे. यातून शेतकऱ्यांना पिकाचा चांगला दर मिळेल.  - प्रकाश मतसागर, मौनगिरी शेतकरी उत्पादक कंपनी, वैजापूर, जि. औरंगाबाद 

    ‘पूट ऑप्शन’ची ही योजना ५ ते ६ वर्ष सुरु ठेवावी. जेणेकरून ‘एफपीओं’ना वायदे बाजारात व्यवहाराची ज्ञान मिळेल आणि सवय होईल. यातून शेतकऱ्यांना थेट फायदा होतो. त्यामुळे अशा उपक्रमांसाठी ‘सीएसआर’मधून आणि सरकारने निधी द्यावा. सरकारी योजनांतील भ्रष्टाचार बघता शेतकऱ्यांना थेट बाजारातील लाभ देणारा हा उपक्रम फायदेशीर आहे.  - योगेश द्विवेदी, मध्य भारत कन्सोर्टियम, भोपाळ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com