Agriculture news in marathi School, college bell will ring today | Agrowon

शाळा, कॉलेजची आज वाजणार घंटा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या शाळा आजपासून (ता. २३) सुरू होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शक सूचना फलक, वर्गखोल्या व विविध विभागांचे सॅनिटायझेशन, साफसफाई, स्वच्छता पूर्ण झाली आहे. 

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या शाळा आजपासून (ता. २३) सुरू होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शक सूचना फलक, वर्गखोल्या व विविध विभागांचे सॅनिटायझेशन, साफसफाई, स्वच्छता पूर्ण झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सद्यःस्थितीत लॉकडाउनमध्ये शिथिलता आणत नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालयांत अधिक कडक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

पालिकेचे कर्मचारीही शहरातील शाळा व महाविद्यालयांत जाऊन प्रत्येक विभाग सॅनिटायझेशन करत आहेत. याचबरोबर प्रत्येक वर्गात येताना विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग होणार असून, मास्क बंधनकारक करण्यात आले आहेत. शाळेतील शिक्षकांचेही कोरोना चाचणीचे अहवाल घेण्यात आले आहेत, तसेच वर्गातील बैठका व्यवस्थाही नियमानुसार होणार आहे. 

शाळांमध्ये स्वच्छता अंतिम टप्प्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहेत. यामध्ये हात स्वच्छ धुणे, मास्क बंधनकारक, विद्यार्थ्यांनी बसताना अंतर ठेवावे आदी प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. याचबरोबर प्रत्येक बेंच व वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन केले आहे. दररोज शाळांचे वर्ग ११ ते दुपारी तीन या वेळेत सुरू राहणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...