agriculture news in marathi, school damages due to flood, satara, maharashtra | Agrowon

कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

महापुराने कऱ्हाड तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या ७९ आणि २० पालिका व इतर माध्यमिक अशा ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील काही शाळांत तर विद्यार्थीच बसू शकत नाहीत तर काही शाळांच्या भिंती कमकुवत झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. त्याचा सर्व्हे करून प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे. 
- शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी, कऱ्हाड. 

कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे तालुक्‍यातील ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या ७९ शाळांचे नुकसान झाले असून, पाचवड मळा, साजूर, टाळगाव, खुबी, रेठरे खुर्द यांसह नदीकाठच्या शाळांत विद्यार्थी बसूच शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने तात्पुरती त्यांची व्यवस्था इतर ठिकाणी केली आहे. मात्र, शालेय वातावरण तेथे नाही, अशी स्थिती आहे. 

कृष्णा-कोयना या मुख्य नद्यांसह तालुक्‍यातून वाहणाऱ्या इतर उपनद्यांच्या काठाला महापुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक घरांत पाणी गेले. त्याचबरोबर अनेक शाळांही बाधित झाल्या आहेत. कऱ्हाड तालुक्‍यातील ९९ शाळा पुराने बाधित झाल्या आहेत. त्यातील ७९ शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. त्यातील अनेक शाळा धोकादायक बनल्याने तेथे विद्यार्थी बसूच शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामध्ये पाचवड मळा, साजूर, टाळगाव, खुबी, रेठरे खुर्द यांसह नदीकाठच्या शाळांचा समावेश आहे. तेथील अनेक इमारती भिजल्या आहेत. त्याचबरोबर भिंतीला ओल चढली असून त्या कधी पडतील, याची खात्री नाही. अनेक शाळांच्या भिंतींना चिरा गेल्या आहेत.

त्याचबरोबर पाचवड मळा शाळेसारख्या काही शाळा या पूर्णतः बाधित झाल्या आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शाळांत, समाजमंदिरात तात्पुरते बसवण्यात येईल. मात्र, तेथे शैक्षणिक वातावरणच नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून तातडीने शाळांच्या उभारणीचा निर्णय घेणे आवश्‍यक आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...
यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...
आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...
नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...
चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...
पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...
पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...