नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार ः भुजबळ

ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा ४ जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिने जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य या प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन करावे. तसेच कोविड लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रशासनामार्फत पूर्व तयारी करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहेत, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
School to start from January 4 in Nashik district: Bhujbal
School to start from January 4 in Nashik district: Bhujbal

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा ४ जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिने जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य या प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन करावे. तसेच कोविड लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रशासनामार्फत पूर्व तयारी करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहेत, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव महानगरपालिका आयुक्त दीपक कासार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर,  पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, पालिका नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, अगतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नंदापूरकर, डॉ. उत्कर्ष दुधडीया आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच आरोग्य यंत्रणेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोविड चाचण्या करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. जेणेकरून शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत सर्व संबंधित शिक्षक व शाळेतील कर्मचारी वर्ग यांचा कोविड तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होवून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना अडचण निर्माण होणार नाही.

येत्या काही दिवसांत सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व नियमित सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहील. - छगन भुजबळ, पालकमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com