agriculture news in Marathi school student will get rice and pulses Maharashtra | Agrowon

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार तांदूळ, डाळी, कडधान्य 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

नगर ः शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे, असे परिपत्रक शालेय शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी काढले. शालेय स्तरावर नियोजन करून विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ व कडधान्यवाटप करणार आहेत. पाथर्डी (जि. नगर) येथील पोपट फुंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शालेय पोषण आहारातील धान्य गरजूंना देण्याची विनंती केली होती. 

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशावरून ग्रामीण भागात शालेय स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्य विद्यार्थ्यांना, तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे. मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिल्लक तांदूळ, डाळी व कडधान्य विद्यार्थ्यांना, तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जगभर पसरलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार राज्यातील शाळा, महाविद्यालये पुढील काही दिवस बंद असून, देशभर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. राज्यातील शाळा व अंगणवाडी बंद असल्यामुळे लहान बालके व विद्यार्थी पोषणआहारापासून वंचित राहू नये, त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळी व कडधान्य वाटप करण्याच्या सूचना शालेय शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिल्या आहेत. 

शाळेत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी अथवा पालकांना शाळेत बोलावून तांदूळ व डाळीचे वाटप करावे. विद्यार्थ्यांना अथवा पालकांना एकमेकांपासून एक मीटरच्या अंतरावर उभे करावे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्याने त्यांना तांदूळ व डाळी घरपोच कराव्यात. लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शालेय स्तरावरील वाटपाची नोंद करावी असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पोपट फुंदे  यांच्या पत्राची शिक्षण विभागाने दखल घेतल्याने फुंदे यांचे अभिनंदन होत आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...