यवतमाळ जिल्ह्यात शाळा  महावितरणच्या ‘डिफॉल्टर’ 

वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. ज्या शाळांनी वीजबिल भरले नाही. अशा शाळांना डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले असून, बिलाचा भरणा न केल्यास त्यांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे.
School in Yavatmal district MSEDCL's 'defaulters'
School in Yavatmal district MSEDCL's 'defaulters'

यवतमाळ : वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. ज्या शाळांनी वीजबिल भरले नाही. अशा शाळांना डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले असून, बिलाचा भरणा न केल्यास त्यांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे.  ‘पैसे द्या, वीज घ्या’, असे नवे धोरण वीज महावितरण कंपनीने सुरू केले आहे. कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती अशा सर्वच ग्राहकांकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. थकबाकी न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण महावितरणचे आहे. कृषिपंपांचे चालू वीजबिल न भरल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शेतकऱ्यांची सद्यःस्थिती व विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महावितरणला निर्णय मागे घ्यावा लागला.  महावितरणने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. शिवाय जिल्ह्यातील आठशे शाळांची थकबाकी ५६ लाखांच्यावर आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदारांना डिफाल्टरच्या यादीत टाकण्यात आले आहे. वीजबिलाचा भरणा न केल्यास शाळांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महावितरणचे १ लाख ६९ हजार ५९५ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे २९ कोटी ५३ लाख ७१ हजार रुपयांची वीजबिलापोटी थकबाकी आहे. 

थकीत रक्कमेचा आकडा मोठा  जिल्ह्यात वीजबिलांची रक्कमेचा आकडा मोठा आहे. घरगुती ग्राहकांकडे ६७ कोटी, वाणिज्यिक साडेनऊ कोटी, औद्योगिक दहा कोटी या शिवाय, पथदिवे, पाणीपुरवठा योजना व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे ५३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात आता शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com