Agriculture News in Marathi School in Yavatmal district MSEDCL's 'defaulters' | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात शाळा  महावितरणच्या ‘डिफॉल्टर’ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. ज्या शाळांनी वीजबिल भरले नाही. अशा शाळांना डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले असून, बिलाचा भरणा न केल्यास त्यांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे. 

यवतमाळ : वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. ज्या शाळांनी वीजबिल भरले नाही. अशा शाळांना डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले असून, बिलाचा भरणा न केल्यास त्यांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे. 

‘पैसे द्या, वीज घ्या’, असे नवे धोरण वीज महावितरण कंपनीने सुरू केले आहे. कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती अशा सर्वच ग्राहकांकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. थकबाकी न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण महावितरणचे आहे. कृषिपंपांचे चालू वीजबिल न भरल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शेतकऱ्यांची सद्यःस्थिती व विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महावितरणला निर्णय मागे घ्यावा लागला. 

महावितरणने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. शिवाय जिल्ह्यातील आठशे शाळांची थकबाकी ५६ लाखांच्यावर आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदारांना डिफाल्टरच्या यादीत टाकण्यात आले आहे. वीजबिलाचा भरणा न केल्यास शाळांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महावितरणचे १ लाख ६९ हजार ५९५ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे २९ कोटी ५३ लाख ७१ हजार रुपयांची वीजबिलापोटी थकबाकी आहे. 

थकीत रक्कमेचा आकडा मोठा 
जिल्ह्यात वीजबिलांची रक्कमेचा आकडा मोठा आहे. घरगुती ग्राहकांकडे ६७ कोटी, वाणिज्यिक साडेनऊ कोटी, औद्योगिक दहा कोटी या शिवाय, पथदिवे, पाणीपुरवठा योजना व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे ५३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात आता शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


इतर बातम्या
लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली...लातूर : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या...
परभणीत पीककर्जाचे ४३.४१ टक्के वाटपपरभणी ः यंदाच्या रब्बी हंगामात १५ जानेवारीपर्यंत...
जळगाव जिल्ह्यातील तीन हजार कार्डधारक ...जळगाव ः शहरासह जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केशरी...
कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक...कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामात बारापैकी पाच...
महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी ः मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या...
न्यायालयाची मुदत संपल्याने ‘श्री...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
सोलापूर जिल्ह्यात वार्षिक योजनेसाठी...सोलापूर ः जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत...
मुद्रा योजनेत ३५ हजार युवकांना १३३...वर्धा : होतकरू युवकांना कर्ज देऊन त्यांना...
‘महावितरण’च्या विरोधात संभाजी ब्रिगेड...परळी वैजनाथ, जि. बीड : संभाजी ब्रिगेडतर्फे...
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...