महापुरुषांच्या गावांतील शाळांचा होणार विकास

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत राज्यातील महापुरुषांच्या जन्म गाव असलेल्या शाळांचा विकास करण्यासाठी पहिल्यांदाच सरकारने दहा शाळांची निवड केली आहे.
Schools will be developed in the villages of great men
Schools will be developed in the villages of great men

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत राज्यातील महापुरुषांच्या जन्म गाव असलेल्या शाळांचा विकास करण्यासाठी पहिल्यांदाच सरकारने दहा शाळांची निवड केली आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रत्येक गावांतील शाळांसाठी एक कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यासाठीची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ११) आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विधानसभेत केली.

राज्याच्या अर्थसंकल्पात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या अंतर्गत १० शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महर्षी धोंडो कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव, प्रवेश घेतलेल्या शाळा अशा शाळांची निवड करण्यात आली आहे. या गावातील शाळांच्या शैक्षणिक सुविधांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

सरकारकडून महापुरुषांच्या मूळ गाव, जन्म गाव आदी ठिकाणच्या शाळांचा विकास करण्यासाठी करण्यात आलेली तरतूद स्वागतार्ह आहे. मात्र हा खर्च केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर केला जावा. आणि समग्र शिक्षा आणि सीएसआर आदी निधी वापरून त्या शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करावा, यामुळे या शाळांची वेगळी ओळख समोर येईल, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व सिस्कॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी व्यक्त केले.

या गावांतील आहेत शाळा...

  • महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
  • राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगाव, कागल, जिल्हा कोल्हापूर 
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा सातारा
  • लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, तालुका वाळवा जिल्हा सांगली.
  • महर्षी धोंडो कर्वे यांचे जन्मगाव मुरुड, जिल्हा रत्नागिरी.
  • साने गुरुजी यांचे जन्मगाव पालगड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी
  • सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोझरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती
  • संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेंडगाव, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती
  • क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळ गाव येडे मच्छिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com