डाळिंब शेतीत शास्त्रीय दृष्टीकोन महत्वाचा : डॉ. सुपे

नाशिक : ‘‘डाळिंब शेतीत शास्त्रीय दृष्टीकोन ठेवणे महत्वाचे आहे,’’ असे मत विभागीय कृषी संशोधन केंद्र, पुणे येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांनी व्यक्त केले.
Scientific approach important in pomegranate farming: Dr. Supe
Scientific approach important in pomegranate farming: Dr. Supe

नाशिक : ‘‘तांत्रिक बाबी सांभाळून डाळिंब शेती केली, तर खर्चात बचत करता येते. त्यासाठी माती परीक्षण करून खत व्यवस्थापन, काटेकोर सिंचन, रोग प्रतिबंधक उपाययोजना करताना आवश्यकतेनुसार फवारण्यांसह डाळिंब शेतीत शास्त्रीय दृष्टीकोन ठेवणे महत्वाचे आहे,’’ असे मत विभागीय कृषी संशोधन केंद्र, पुणे येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांनी व्यक्त केले. 

नाशिक येथील के. के. वाघ कृषी व अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे ''डाळिंब लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान'' यावर सोमवारी (ता.३१) ऑनलाइन शेतकरी मेळावा घेण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम कड यांनीही शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण केले.

डॉ. सुपे यांनी डाळिंब झाडाची प्रतिकूल अनुकुलता, सूर्यप्रकाशाचे महत्त्व, कॅनोपी व्यवस्थापन, सूक्ष्मजीव, अँटीबायोटिक, संप्रेरके यांचा वापर, बहार नियोजन आदीवर मार्गदर्शन केले. 

डॉ. कड म्हणाले, ‘‘डाळिंबांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. सध्याच्या कोविडच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डाळिंबाचे सेवन केले जात आहे. यामुळे बाजारपेठेत या फळास चांगली मागणी आहे. सध्या डाळिंबाची शेती देशात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वाढत चाललेल्या उत्पादनाबरोबरच दर स्थिरता प्राप्त करण्यासाठी काढणीपश्चात प्रक्रिया मूल्यवर्धित उत्पादने तसेच औषध निर्मितीमध्ये खूप मोठी संधी आहे.’’

‘‘समाजामध्ये आरोग्याबद्दलच्या वाढत्या सतर्कतेमुळे डाळिंबांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे विपणन करणे खूप सोपे झाले आहे,’’ असेही डॉ. कड यांनी सांगितले.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिशकुमार हाडोळे यांनी प्रस्तावना केली. तर कॅम्पस समन्वयक डॉ. व्हि. एम. सेवलीकर यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. प्रा.नेहल भोकनळ, परिचय प्रा. अर्चना जाधव सहकार्य केले.

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नितीन देवशेटे यांनी आभार मानले. संयोजन प्रा. तुषार उगले, प्रा. सोनल चौधरी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ, सचिव के. एस. बंदी व विश्वस्तांचे मार्गदर्शन लाभले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com