कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ बोंड अळी नियंत्रण मोहिमेत सहभागी
कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ बोंड अळी नियंत्रण मोहिमेत सहभागी

कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ बोंड अळी नियंत्रण मोहिमेत सहभागी

नांदेड ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रांतर्गतचे शास्त्रज्ञ जिल्ह्यात सुरू असलेल्या बोंड अळी नियंत्रण मोहिमेमध्ये सहभागी झाले असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन कीड व्यवस्थापन सल्ला देत आहेत. त्याचप्रमाणे भ्रमणध्वनीद्वारेदेखील शेतकऱ्यांना बोंड अळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या संदर्भात कापूस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. खिजर बेग यांनी माहिती दिली.

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे विद्यापीठ आपल्या दारी, पीक संरक्षण तंत्रज्ञान शेतावरी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. खिसर बेग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, सर्व उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहिमेत सहभागी झाले आहेत.

मराठवाड्यामध्ये कपाशीचे क्षेत्र जवळपास १५ लाख हेक्टर आहे. गतवर्षी बोंड अळीमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी बोंड अळीचे नियंत्रण वेळेवर करावे. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. शास्त्रज्ञ शेतावर जाऊन कापूस पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत. शेतकऱ्यांनी बोंड अळी नियंत्रणासाठीच्या उपयायोजना करीता डॉ. खिजर बेग (७३०४१२७८१०), प्रा. डी. व्ही. पाटील (७५८८०८२१५५), डॉ. एस. एम. तेलंग (९४२१५६९०१८), प्रा. अरविंद पडांगळे (७५८८५८१७१३), डॉ. पवन ढोके (७५८८५८१७३३), प्रा. ए. आर. गायकवाड (९४२००३८६८३) या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बेग यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com