शास्त्रज्ञांचे थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन

शास्त्रज्ञांचे थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन
शास्त्रज्ञांचे थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन

औरंगाबाद : ‘विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ या उपक्रमांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बुधवारी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पैठण तालुक्‍यातील विविध गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करीत शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

‘विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ हा उपक्रम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मराठवाडा विभागात सप्टेंबर महिन्यात राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने खरीप पिकाचे कीड व रोगनिदान करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विविध विषयाचे कृषिशास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्षात पीकपाहणी करून वेळेवर उपाययोजना करण्याविषयी सल्ला देतात.

या उपक्रमामुळे वेळेवर मार्गदर्शन मिळाल्याने संभाव्य शेतीपिकाचे नुकसान रोखण्यासाठी मदत होते. हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शन लाभते आहे. 

याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. ४) पैठण तालुक्‍यात शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. नितीन पतंगे, प्रा. सुरेखा कदम, विभागीय कृषी विस्तार केंद्राचे रामेश्वर ठोंबरे आदींनी विविध गावांत थेट शेतात जाऊन पीकपाहणी केली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी बिडकीन रामनाथ कारले यांच्या मंडळातील गावातील शेती पीकपाहणीने सुरवात करण्यात आली. कृषी अधिकारी पैठण रामेश्वर भुते यांच्या सहकार्याने दिवसभर शास्त्रज्ञांनी विविध गावांमधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com