Agriculture news in Marathi The scourge of malnutrition in Thane district has not abated | Page 2 ||| Agrowon

ठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा सुटेना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण सुटेनासे झाले असून आजही विशेष करून ग्रामीण भागात कुपोषित बालके आढळून येत आहेत. ऑगस्टअखेरपर्यंत १३३ तीव्र आणि १३०५ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रामधील बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली नाही.

मुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण सुटेनासे झाले असून आजही विशेष करून ग्रामीण भागात कुपोषित बालके आढळून येत आहेत. ऑगस्टअखेरपर्यंत १३३ तीव्र आणि १३०५ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रामधील बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली नाही. अन्यथा कुपोषित बालकांचा आकडा आणखी वाढला असता, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. विशेष योजना राबवल्या जात असूनही कुपोषणाची समस्या कायम आहे. माताच कुपोषित असल्यास जन्मणारे बाळही कुपोषित असते. त्यामुळे जिल्हा कुपोषणमुक्त होणार कधी, हा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या अभियानाची थीमही ‘कुपोषणमुक्त भारत’ अशी आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिनाभर अॅनेमिया, अतिसार, पौष्टिक आहार, स्वच्छता, कुपोषण आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या सर्व उपाय योजनानंतरही जिल्ह्यात कुपोषित बालके आढळत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २०१९च्या डिसेंबरअखेर पर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या १८५६ होती. तर तीव्र कुपोषित (सॅम) बालके ३३९ होती. या महिन्यात १ लाख ७ हजार ५४५ बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये वजन आणि उंची घेतलेल्या बालकांची संख्या १ लाख १० हजार ८११ होती. या महिन्यात मध्यम कुपोषित बालके २०६३ आणि २०९ तीव्र कुपोषित बालके होती.

प्रत्येक महिन्याला बालकांची संख्या कमी-जास्त होत असल्याचे दिसून येते. परंतु जिल्ह्यात जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसे प्रतिबंधित क्षेत्रातील बालकांची वजन आणि उंची घेण्याचे काम थांबले. त्यामुळे एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये वजन आणि उंची घेण्यात आलेल्या बालकांची संख्या कमी आहे. शिवाय तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या कमी दिसून येते.

सर्व बालके ग्रामीण भागातील
एप्रिलमध्ये १३०५ बालके मध्यम तर तीव्र कुपोषित १०२, मे मध्ये अनुक्रमे मध्यम ११९४, तीव्र कुपोषित ११२ बालके, जूनमध्ये १०७९, ११६, जुलैमध्ये ११३८, १३१ बालके मध्यम आणि तीव्र कुपोषित होती. तर आता ऑगस्ट अखेरपर्यंत मध्यम कुपोषित बालकांची संख्या १३०५ होती. तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १३३ होती. ही सर्व बालके ग्रामीण भागातील आहेत. ऑगस्टमधील सर्वेक्षित बालकांची संख्या १ लाख १९ हजार २३९ आणि ९० हजार ८५८ बालकांची उंची आणि वजन घेण्यात आले होते.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...