agriculture news in Marathi, The scurf of the leopards in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

नाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच माडसंगवी शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एक वासरू व एक पारडू ठार झाले. परिसरात बिबट्याचे ठसे आढळले. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर बिबट्याने हल्ला केल्याचे सिद्ध झाले आहे. 

नाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच माडसंगवी शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एक वासरू व एक पारडू ठार झाले. परिसरात बिबट्याचे ठसे आढळले. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर बिबट्याने हल्ला केल्याचे सिद्ध झाले आहे. 

मंडसंगवी शिवारातील डॉ. समीर पेखळे यांच्या घरापासून दोनशे मीटरवर असलेल्या गोठ्यात बिबट्याने हल्ला केला. सकाळी गोठ्याची पाहणी करत असताना वासरू व पारडू मृतावस्थेत आढळले. या बाबत वन विभागाला कळविण्यात आले. जवळच उसाचा मळा असल्याने लपला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे माडसंगवी परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

शहरातील आडगाव परिसर येथे यापूर्वी चार शेळ्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या होत्या. तसेच नाशिक तालुक्यात नानेगाव, बेलत गव्हाण, शेवगे दारणा तसेच निफाड तालुक्यात कारसुळ, रौळस, नारायण टेंभी, वडाळी नजीक परिसरात बिबट्याची दहशत आहे. याठिकाणी ही शेळी, कुत्रे यांच्यावर हल्ले झाले आहेत. 

मागील आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला आहे.  परमोरी परिसरात वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे. पशु तसेच माणसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वेळीच वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.

अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार
परमोरी येथे गेल्या सहा महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांत वनविभागाने बिबटे जेरबंद केले नाहीत, तर येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर पोलिस यंत्रणा व वन विभागाला कळविण्यात येते. अशा वेळी पोलिस यंत्रणा वेळेवर हजर होते. मात्र, वन विभाग वेळेवर हजर न होता हलगर्जीपणा करते. बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही. तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आहे.
- बाळासाहेब काळोगे, माजी सरपंच, परमोरी, ता. दिंडोरी


इतर ताज्या घडामोडी
धुळे जिल्ह्यात लष्करी अळी...देऊर, जि.धुळे : देऊर (ता.धुळे) सह तालुक्यात...
सुरवाडे परिसरात अतिमूसळधार पाऊस जळगाव : बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात...
निसर्ग चक्रीवादळबाधित वीज ग्राहकांचा...मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या वीज...
नामपूर बाजार समितीत ‘रयत’चे आंदोलन नामपूर, जि. नाशिक :  कांदा व डाळिंब उत्पादक...
नांदेडमध्ये सव्वा दोन लाख क्विंटलवर...नांदेड : जिल्ह्यात कोरोना साथीमध्ये राज्य सहकारी...
मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या...औरंगाबाद  : तालुक्यातील आडगाव, निपाणी,...
पीक कर्जवाटपात व्यापारी बॅंकांचा ‘ना’...औरंगाबाद : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या...
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बुधवारी (...
मका पिकासाठी ठिबक सिंचनमका लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी आणि...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
पीक संरक्षणासाठी चिकट सापळ्यांचे प्रमाण...कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य...
कॅनोपी व्यवस्थापनातून रोगनियंत्रणसध्याच्या वातावरणाचा विचार करता प्रत्येक ठिकाणी...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
नाशिकमध्ये दोडका २९१० ते ७०८० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...