आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘एसडीओ’ बांधावर

संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी हडपल्याप्रकरणी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार चौकशी सुरू झाली आहे.
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘एसडीओ’ बांधावर On SDO dam to search for tribal lands
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘एसडीओ’ बांधावर On SDO dam to search for tribal lands

बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी हडपल्याप्रकरणी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व मलकापूर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख करीत आहेत. या जमिनींच्या चौकशीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी तक्रार करीत मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती फेब्रुवारीत नेमली. कोरोना संसर्गामुळे समितीला चौकशीसाठी विलंब झाला.  जमीन प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीचे सदस्य संग्रामपूर तहसीलदार कार्यालयात दाखल झाले होते. या ठिकाणावरून डिक्कर यांनी दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना सातपुड्यातील चिचारी येथील संबंधित शिवारात नेले. तेथे हडपण्यात आलेल्या आदिवासींच्या जमिनी दाखविल्या. चौकशीसाठी अधिकारी दाखल झाल्याची आदिवासींना माहिती मिळताच चिचारी येथील भूमिहीन झालेले सर्व मूळ आदिवासी खातेदार हजर झाले. जमिनीचे सातबारे गैर आदिवासींनी नावावर केल्याने मूळ मालकांचा हक्क गायब झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com