agriculture news in Marathi SEA Says not to cut edible oil import duties to curb inflation Maharashtra | Agrowon

खाद्यतेल आयात शुल्कात कपात करू नयेः एसईए

कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

काही प्रमाणात झालेली भाववाढ ही देशासाठी चांगलीच असते. ही भाववाढपातळी दीर्घ काळासाठी स्थिर ठेवल्यास परिणाम चांगलेच होतील. 
- अतुल चतुर्वेदी, अध्यक्ष, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

नवी दिल्ली: आग्नेय आशियातील देशांबरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारानुसार एक जानेवारीपासून रिफाइंड पामतेल आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के आणि कच्च्या पाम तेलावरील शुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्यात येणार आहे. मात्र ‘‘केंद्र सरकारने भाववाढ कमी करण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करू नये. शुल्कापासून मिळणारे जास्तीचा निधी हा तेलबिया विकास फंडासाठी वापरावा,’’ अशी मागणी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सरकारकडे केली आहे. 

भारत हा जगातील सर्वांत मोठा पामतेल आयातदार देश आहे. भारतात दरवर्षी ९० लाख टन खाद्यतेल आयात होते. मागील वर्षी देशातील एकूण खाद्यतेल आयातीपैकी तब्बल ६२ टक्के पामतेल आयात होती. देशातील एकूण खाद्यतेल आयात ही ७ हजार कोटी रुपयांची होते. 

भारताने आग्नेय आशियातील देशांबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. या करारानुसार एक जानेवारीपासून खाद्यतेल आयातीवरील शुल्कात कपात करण्यात येणार आहे. या रिफाइंड पामतेल आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के करण्यात येईल, तर कच्च्या पामतेलावरील शुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्यात येणार आहे. खाद्यतेल आयातीवरील शुल्कात कपात केल्यास देशातील उद्योग अडचणीत येतील. त्यामुळे या कपातीला देशातील खाद्यतेल उद्योगातून विरोध होत आहे. यात रिफाइंड तेलावरील शुल्क कपातीमुळे अधिक धोका असल्याचे उद्योगातील जाणकारांनी म्हटले आहे.    

देशात तेलबिया उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार तेलबिया विकास निधीची तरतूद करते. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले की ‘‘जागतिक पातळीवर खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे केंद्राच्या कस्टम ड्यूटीत वाढ होणार आहे. यातून मिळेलेला शिल्लकचा निधी हा मोठ्या कालावधीपासून रेंगाळलेल्या तेलबिया विकास निधाला द्यावा आणि देशातील तेलबिया उत्पादनाला चालना द्यावी. त्यामुळे आयात शुल्क कमी न करता भाववाढीकडे दुर्लक्ष करणे लाभदायक आहे.’’

‘‘जागतिक पातळीवर पामतेलाचे दर वाढल्याने इतर खाद्यतेलाचेही दर वाढले आहेत. मार्चसाठीचे पामतलाचे करार हे ०.३ टक्क्यांनी अधिकच्या दराने झाले आहेत,’’ अशी माहिती खाद्यतेल व्यापारातील सूत्रांनी दिली.

खाद्यतेल दृष्टिक्षेपात

  • आग्नेय आशियातील देशांबरोबर मुक्त व्यापार करार 
  • रिफाइंड पामतेलावरील शुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के होणार 
  • कच्च्या पामतेलावरील शुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के होणार
  • भारतात दरवर्षी ९० लाख टन खाद्यतेल आयात
  • खाद्यतेल आयातीवर ७ हजार कोटी खर्च
  • एकूण खाद्यतेल आयातीत ६२ टक्के पामतेल 
  •  जागितक पातळीवर पामतेलाचे दर वाढले
  • आयात शुल्ककपातीमुळे देशातील उद्योग डबघाईला येईल ः जाणकार

इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...