बीड जिल्ह्यात मेंढपाळांची चाऱ्याच्या शोधात भटकंती

बीड जिल्ह्यात मेंढपाळांची चाऱ्याच्या शोधात भटकंती
बीड जिल्ह्यात मेंढपाळांची चाऱ्याच्या शोधात भटकंती

अंबड, जि. जालना ः मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चारा-पाण्याच्या प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात तालुक्‍यातील शिवारात दाखल झाले आहेत. मात्र, येथेही परिस्थिती फार वेगळी नसल्याने मेंढरांना कसे जगवावे हा प्रश्‍न मेंढपाळांसमोर आहे. बीड जिल्ह्यात मेंढपाळांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. 

यंदा पाऊस कमी झाल्याने दोन्ही हंगाम हातचे गेले आहेत. परिणामी ज्वारीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतात मेंढ्या बसवून मेंढपाळांना मोबदल्यात धान्य देणे; तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे शेतकऱ्यांना यंदा शक्‍य नाही. यामुळे यंदा मेंढपाळांवर चारा-पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे. 

अंबड तालुक्‍यातील आलमगाव-हस्तपोखरी शेतशिवारात इतर जिल्ह्यांतील अनेक मेंढपाळ व धनगर समाजबांधव दाखल झाले आहेत. आश्रय मिळेल तेथे बस्तान मांडून हे पशुपालक आलेला दिवस पुढे ढकलत आहे. मात्र, पावसाळ्यापर्यंतचा काळ कसा जाईल ही चिंता मेंढपाळांना सतावत आहे. शिवाय परिसरात पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

दुष्काळाशी दोन हात करत पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथे, तर उद्या तेथे याप्रमाणे भटकंती करत आहोत. १९७२ च्या दुष्काळापेक्षा भयानक परिस्थिती यंदा जाणवत आहे. पूर्वी शेतकरी मेंढ्या शेतात बसवत त्या मोबदल्यात धान्य देत. त्यामुळे जगायला आधार मिळत असे. आता स्थिती बदलली आहे.  - बबन चोरमारे, मेंढपाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com