जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत करा
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत करा

जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत करा

 पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सक्तवसुली संचालनालयामार्फत करण्यात यावी. या गैरव्यवहारात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचेदेखील हात अडकले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केली. आम आदमी पक्षाचे सागर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. या वेळी पक्षाचे कार्यकर्ते आनंद जाधव, महादेव माने, आनंद देशपांडे, जगदीश कुलथे उपस्थित होते. जुनी मिल ही तोट्यात निघाल्याने कामगारांची देणी देण्यासाठी मिलच्या जमिनीचा लिलाव करावा, त्यातून देणी द्यावी असा निर्णय झाला होता. त्यानुसार कामगारांच्या "जुनी मिल बेकार कामगार वारसदार' संघटना आणि जनहित संघर्ष समिती यांनी लोकांकडून पैसे जमा करून मिलची १३६ एकर जागा लिलावात खरेदी केली. परंतु ट्रस्टचे अध्यक्ष कुमार करजगी यांनी परस्पर जमिनीचे वारसदार म्हणून त्या जमिनीवर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव नोंदवून घेतले. त्यानंतर नातेवाइकांच्या नावाने विनामोबदला या जमिनींचा करार करून परस्पर तिची विक्री केली. याबाबत या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com