सांगोल्यात वाळूमाफियांचा तलाठी, मंडलाधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

A search of sand muffins an attempt to put a tractor on officers in Sangola
A search of sand muffins an attempt to put a tractor on officers in Sangola

सोलापूर  : अवैधरीत्या वाळूउपसा करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूमाफियांनी ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना दमदाटीही केली. शनिवारी (ता. ३०) सकाळी सातच्या सुमारास आगलावेवाडी येथे जत रस्त्यावर हा प्रकार घडला.

चालक चंद्रकांत वसंत गवंड, सुरेश वसंत गवंड, नंदकुमार विठ्ठल वगरे (सर्व रा. बुरंगेवाडी, ता. सांगोला) अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत. तहसीलदार योगेश खरमाटे यांच्या आदेशानुसार अवैध वाळूउपशावर कारवाई करण्यासाठी जवळा मंडलचे मंडल अधिकारी दत्तात्रेय कांबळे, हातीद मंडलचे मंडल अधिकारी धनंजय इंगोले, तलाठी संभाजी जाधव हे मोटारसायकलवरून निघाले होते. 

कोरडा नदीपात्रात ट्रॅक्टरमध्ये चोरून वाळू भरण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंडल अधिकारी व तलाठी हे आगलावेवाडी ते जत रस्त्याने निघाले होते. माने वस्तीसमोर विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू घेऊन जाताना दिसला. त्यांनी मोटारसायकली आडव्या लावून ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रॅक्टरचालक चंद्रकांत गवंड याने ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कोण अवडतो ते बघतो’ असे म्हणत कांबळे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर अंगावर येत असल्याचे पाहून ते बाजूला झाले. 

कांबळे यांनी गवंड याच्याकडे वाळू वाहनाचा परवाना आहे का? याची विचारणा केल्यावर त्याने डवाउडवीची उत्तरे दिली. ट्रॅक्टर सांगोला येथील तहसील कार्यालयाकडे घेऊन जाण्यास सांगितल्यानंतर ट्रॅक्टरमधील सुरेश गवंड, नंदकुमार वगरे यांनी कांबळे यांना शिवीगाळ केली. तसेच ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे नेणार नाही, काय करायचे ते करा, असे म्हणत दमदाटी केली. दरम्यान, चंद्रकांत गवंड हा वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. या प्रकरणी कांबळे यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com