agriculture news in Marathi searching of vice chancellor for rahuri agriculture university Maharashtra | Agrowon

राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला आहे. याबाबत राज्यपाल आज (ता.२२) बैठक घेण्याची शक्यता आहे.

पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला आहे. याबाबत राज्यपाल आज (ता.२२) बैठक घेण्याची शक्यता आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने परिषदेला पाठविलेल्या अहवालानुसार विद्यमान कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा यांच्या पदाचा अवधी पाच नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. त्यामुळे नवा कुलगुरू नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड समितीचे पदसिध्द सदस्य म्हणून परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा सध्या माहिती घेत आहेत. राज्यपाल व महासंचालक यांच्यात आज (ता.२२) चर्चा होऊन पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुलगुरू निवडीची जबाबदारी शास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मणसिंह राठोड यांच्यावर सोपविली आहे. ते यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक होते. डॉ. राठोड यांना अधिकृतपणे कुलगुरू निवड समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. समिती सदस्य म्हणून कृषी सचिव एकनाथ डवले यांचाही अभिप्राय कुलगुरू निवडीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार सध्या या निवडीच्या प्रशासकीय घडामोडी हाताळत आहेत.

‘‘डॉ. विश्वनाथा यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील यापैकी जो अवधी आधी पूर्ण होईल तोपर्यंत केली गेली होती. या अटीनुसार ते चार नोव्हेंबरला ६५ वर्षे पूर्ण करीत आहेत,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

पात्रता बदलण्याच्या हालचाली
कुलगुरुपदी एका विशिष्ट उमेदवाराची वर्णी लावण्यासाठी अनुभवाचे निकष हालचाली थेट राजभवनात सुरू असल्याची जोरदार चर्चा विद्यापीठात आहे. ‘‘मला कुलगुरू करण्यासाठी आठ वर्षाचा प्रशासकीय अनुभव पाच वर्षावर आणा,’’ असा आग्रह एका उमेदवाराने धरला आहे. आपले म्हणणे राजभवनात नेण्यासाठी या उमेदवाराने जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यामुळे राज्यपाल आता नियमांची मोडतोड करणार की आधीच्या चांगल्या नियमांना पाठिंबा देणार, याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष लागून आहे.


इतर अॅग्रो विशेष
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...
एकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील...
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...