Agriculture news in marathi The season of 36 factories is still underway in the state | Page 3 ||| Agrowon

राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम सुरू 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप करीत राज्यात अग्रक्रम पटकाविला आहे. या कारखान्याने १६२ दिवसांमध्ये हंगाम पूर्ण करताना १८ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप करीत अव्वल स्थान पटकावले.

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप करीत राज्यात अग्रक्रम पटकाविला आहे. या कारखान्याने १६२ दिवसांमध्ये हंगाम पूर्ण करताना १८ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप करीत अव्वल स्थान पटकावले. १२.१४ टक्के उताऱ्‍याने २२ लाख ९२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. 

नगर जिल्ह्यातील अंबालिका या खासगी कारखान्याने १६ लाख ७ हजार टन गाळप करीत दुसरा, तर सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने १५ लाख १ हजार ८०० टनांचे गाळप करीत तिसरा क्रमांक पटकाविला. यंदाच्या हंगामात जादा गाळप करणाऱ्‍या पहिल्या वीस कारखान्यांमध्ये कोल्हापूर व नगर जिल्ह्यातील प्रत्येकी पाच कारखान्यांचा समावेश आहे. १९ एप्रिलअखेर राज्यातील १५४ साखर कारखान्यांनी हंगाम आटोपला आहे. 

यंदा बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत सुरुवात झाली. यंदा कोल्हापूर विभागात हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाळी हवामान असल्याने हंगाम रखडत सुरू झाला. पहिल्या पंधरा दिवसांत पुणे व नगर विभागाने आघाडी घेतली. यानंतर मात्र कोल्हापूर विभागाने गाळपात आघाडी घेतली. यंदा १९० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. 
यंदा ज्या साखर कारखान्यांनी गाळपक्षमता अधिक आहे. त्या कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्राद्वारे तोडणी करून गाळपक्षमतेने उसाचे गाळप केले. सर्वाधिक गाळप करणाऱ्‍या पहिल्या वीस कारखान्यांमध्ये कोल्हापूर, नगर खालोखाल पुण्यातील चार, तर सातारा, सोलापूरमधील तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे. 

उताऱ्यात सह्याद्रीची बाजी 
या कालावधीअखेर सातारच्या सह्याद्री साखर कारखान्याचा १२.६५ टक्के इतका सर्वाधिक सरासरी उतारा राहिला आहे. या खालोखाल आसुर्ले पोर्लेच्या दालमिया साखर कारखान्याने १२.५८, तर शिरोळच्या दत्त साखर कारखान्याने १२.४३ टक्के उतारा राखत आघाडी घेतली. 

१९ एप्रिलअखेरची हंगामाची स्थिती, सध्या ३६ कारखाने सुरू 
झालेले गाळप ९९९.५० लाख टन 
सरासरी उतारा १०.४८ टक्के
उत्पादित साखर १०५ लाख टन 

इतर अॅग्रो विशेष
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...