Agriculture News in Marathi The season is in full swing, labor is not available | Agrowon

हंगाम जोरावर, मजूर मिळेनात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

नांदुरा तालुक्यातील सध्या सोयाबीन सोंगणी व कापूस वेचणीसाठी मजूर न मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहले आहे. मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ होत आहे.
 

नांदुरा, जि. बुलडाणा : तालुक्यातील सध्या सोयाबीन सोंगणी व कापूस वेचणीसाठी मजूर न मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहले आहे. मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ होत आहे.

मागील गत आठवड्यापासून तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन काढणी तसेच कापूस वेचणीची लगबग सुरू झाली आहे. सोयाबीन सोंगणीसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये एकरी दर द्यावा लागत आहे. तर कापूस वेचणीसाठी १० ते १२ रुपये किलो प्रति किलोचा भाव देऊनही मजूर मिळेनासे झालेले आहेत. अशी परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर गावात मजूर मिळत नसल्याने अन्य गावांतून मजूर आणून सोयाबीनची सोंगणी करून घेत आहेत. बाहेर गावावरून मजूर आणताना त्यांच्या जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वाहनाची व्यवस्था व त्याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागत आहे.

ऑगस्टमध्ये पडलेला पाऊस व सप्टेंबर महिन्यात काही दिवस झालेली अतिवृष्टी यामुळे सोयाबीन शेंगाना कोंब फुटले तर काही शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेल्या सोयाबीन खराब झाली. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, एकरी ७ ते ८ पोते उत्पादन होईल, अशी आशा बाळगून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. अपेक्षेपेक्षा अर्धे उत्पादन झाले आहे. उडीद व मुगाला पावसाचा फटका बसला होता. सोयाबीन सोंगण्याचे दर वाढल्याने मजूर जरी आनंदीत असला तरी मिळणाऱ्या उत्पादनातून व सोंगणीसाठी मोजाव्या लागणाऱ्या रकमेबाबत शेतकरी समाधानी नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आधीच शेतकरी पिकांचे नुकसान झाल्याने अडचणीत सापडलेला आहे. पीक विमा काढलेल्या तसेच ज्यांनी काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांनाही सरसकट भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.

खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी
कापसाची खरेदी करणारे व्यापारी हे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन ६ ते ७ हजार रुपये भाव देत आहेत. तर दुसरीकडे वेचणीसाठी १० ते १५ रुपये किलोला भाव द्यावा लागत आहे. क्विंटलला हजार ते दीड हजारांचा खर्च होत आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत वेचाईचा खर्च अव्वाच्या सव्वा झाला आहे.


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...