agriculture news in marathi, off season grapes harvesting starts in Baglan, Nashik | Page 3 ||| Agrowon

पूर्वहंगामी द्राक्ष काढणीस प्रारंभ; बागलाण तालुक्यात हंगामाची उत्सुकता

मुकुंद पिंगळे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नाशिक : जिल्ह्यातील प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा तालुका म्हणून बागलाणने आंतरराष्ट्रीय बाजारात ओळख मिळविली आहे. चालू वर्षीसुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला द्राक्षांची छाटणी करून पूर्वहंगामी द्राक्ष हंगाम यशस्वी केला आहे. सध्या काढणी सुरू असून, देशांतर्गत शहरांमध्ये द्राक्ष पाठवायला सुरुवात झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा तालुका म्हणून बागलाणने आंतरराष्ट्रीय बाजारात ओळख मिळविली आहे. चालू वर्षीसुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला द्राक्षांची छाटणी करून पूर्वहंगामी द्राक्ष हंगाम यशस्वी केला आहे. सध्या काढणी सुरू असून, देशांतर्गत शहरांमध्ये द्राक्ष पाठवायला सुरुवात झाली आहे.

अचूक नियोजन, कष्टाची तयारी व हंगामनिहाय वर्षभर व्यवस्थापन करत अनेक शेतकरी पूर्वहंगामी द्राक्ष पिकात पुढे आले आहेत. सुरुवातीला पाण्याची अडचण असताना मल्चिंग व पाण्याचे नियोजन करून फेब्रुवारीमध्ये खरड छाटण्या झाल्या. नंतर जूनपासून द्राक्षांची गोडी छाटणी करून द्राक्षबाग फुलविण्याचा प्रयोग यावर्षीही यशस्वी केला आहे. या भागात प्रामुख्याने शरद सीडलेस, क्लोन २, थॉमसन, सोनाका या व्हाइट व्हरायटीचे वाण घेण्यात आले. यांसह कलरमध्ये जंबो, रेड ग्लोब, क्रीमसन, शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल या व्हरायटी घेण्यात आल्या. अर्ली द्राक्षाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागलाणमध्ये द्राक्ष हंगाम सुरुवात झाली आहे. 

येथे सुरू आहे द्राक्ष काढणी 
सध्या अमरावतीपाडा, पारनेर, मुंगसे, बिलपुरी, बिजोटे, भुयाणे, पारनेर, वायगाव, दासाने, लाडूद या परिसरात काढणी सुरू केली आहे. हा काढलेला माळ कानपुर, अहमदाबाद, इंदोर, जयपूर, दिल्ली या ठिकाणी पाठविण्यात येत आहे.

मिळणारे दर

  • शरद सीडलेस :  १३५ रु प्रतिकिलो
  • क्लोन  :   ८५ रु प्रतिकिलो
  • सोनाका  : ६० ते ६५ रु प्रतिकिलो

पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनाचे टप्पे 

  • फेब्रुवारी -मार्चमध्ये खरड छाटणीवेळी पाणीटंचाई
  • मल्चिंग, पाणीव्यवस्थापन करून नियोजन
  • पावसामुळे पोंगा अवस्थेत अडचणी व कूज  
  • पावसाच्या अडचणींनंतर घड काढणीसाठी तयार

उन्हाळ्यात असल्याने खरड छाटणी ची कामे अडचणीत सापडली होती. मात्र पाणी व्यवस्थापन करून हंगामाचे नियोजन केले. इतर पिकांना फाटा देऊन हंगाम प्रतिकूल परिस्थितीत पाच एकर बाग उभा केला आहे.
- चैत्राम पवार, द्राक्ष उत्पादक, वायगाव, ता.बागलाण

सुरुवातीला पाणीटंचाई आली त्यामुळे छाटण्या लांबणीवर गेल्या. मोठ्या अडचणीतून बागा तयार केल्या. मात्र पोंगा खराब व घडकूज झाल्याने ३० टक्के नुकसान होणार आहे. आता काढणीला माल आला. मात्र पावसामुळे माल काढण्यास अडचणीं येत आहेत.
- खंडू शेवाळे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक, भुयाने, ता. बागलाण


इतर अॅग्रो विशेष
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...