agriculture news in marathi seasonal breeding management in Buffalo | Agrowon

ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापन

डॉ. अनिल पाटील
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

अधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम असणे महत्त्वाचे आहे. वगारी लवकर वयात येणे किंवा गर्भधारणा होण्याकरिता सक्षम असणे. व्याल्यानंतर ८० ते ८५ दिवसांत म्हशीमध्ये पुन्हा गर्भधारणा होणे, माजाचे नियोजन, म्हणजेच योग्य माज ओळखणे व वेळीच रेतन करणे गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

अधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम असणे महत्त्वाचे आहे. वगारी लवकर वयात येणे किंवा गर्भधारणा होण्याकरिता सक्षम असणे. व्याल्यानंतर ८० ते ८५ दिवसांत म्हशीमध्ये पुन्हा गर्भधारणा होणे, माजाचे नियोजन, म्हणजेच योग्य माज ओळखणे व वेळीच रेतन करणे गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

 • ऋतुमानानुसार म्हशीमधील व्यवस्थापनात बदल करणे फायदेशीर व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तिन्ही ऋतूंतील बदल वेगवेगळे आहेत. त्यानुसार प्रजननातपण बदल घडून येत असतात. त्यासाठी म्हशीतील ताण कमी करून प्रजनन प्रक्रियेवर लक्ष द्यावे.
  म्हशींना भरपूर पाणी, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, संतुलित खाद्याचा, क्षार मिश्रणांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे गरजेचे आहे. वेळोवेळी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वेळीच निदान व योग्य उपचार करावेत. त्यामुळे वीण्याची प्रक्रिया सुलभ होते, वंध्यत्वाचे प्रमाण व इतर प्रजननविषयक अडथळे दूर होतात.

ऋतुमानानुसार प्रजननातील बदल

 • उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा तीन ऋतूंमध्ये म्हशीमधील प्रजन विषयक बाबीमध्ये अनेक वेगवेगळे बदल होत असतात. त्यामुळे वातावरणातील बदलानुसार प्रजननकार्यात वेगवेगळा बदल दिसून येतो.
  म्हशीकरिता हिवाळा व पावसाळा हे दोन ऋतू प्रजननाकरिता पोषक असतात. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात म्हशीमध्ये मुका माज असलेला दिसून येतो. गर्भधारणा होणे अथवा न होणे, गर्भपात होणे किंवा व्याण्याच्या प्रक्रियेतील बदल होणे या व इतर अनेक बाबींमध्ये बदल दिसून येतो.

हिवाळ्यातील प्रजनन

 • पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू होतो आणि त्यानुसार म्हशीमधील प्रजननविषयक बदल झालेला दिसून येतो.
   
 • हिवाळ्यातील थंड हवामान म्हशीमधील प्रजनन कार्याकरिता पोषक असते. ज्या म्हशी उन्हाळ्यात माज दाखविल्या नाहीत, त्या यादरम्यान माज दाखवतात अशा म्हशींना रेतन करणे गरजचे असते.
   
 • प्रजननक्रिया या ऋतूंमध्ये जास्तीची सक्रिय होत असते. यादरम्यान बहुतांश म्हशी गाभण राहतात व हाच कालावधी वीण्याचाही असतो.

अतिथंड वातावरणामध्ये म्हशींची काळजी

 • अतिथंड वातावरणामुळे म्हशींतील उत्पादन व प्रजननक्षमतेवर परिणाम होतो व उत्पादकता कमी होते जसे की दुध उत्पादन घटते, माज दिसून येत नाही व इतर समस्या उद्भवतात.
   
 • म्हशींच्या अंगावरती गोणपाट टाकणे.
   
 • हलकेसे गरम पाणी पिण्यास देणे.
   
 • गोठ्यामध्ये शेगडी पटवणे किंवा हलकासा विस्तव तयार करणे जेणेकरून वातावरण थोडेसे गरम राहिले पाहिजे.
   
 • गोठ्याच्या चारही बाजू किमान रात्रीच्या वेळी बंद करणे आवश्यक असते.

उन्हाळ्यातील म्हशींमध्ये होणारे प्रजननविषयक बदल

 • सर्वसाधारणपणे अतिउष्णतेमुळे प्रजनन क्रिया सक्रिय नसते.
   
 • मुका माज येतो, यात माजाची तीव्र लक्षणे दिसत नाहीत.
   
 • गर्भधारणेचे प्रमाण कमी होते, फलनाची क्रिया यशस्वी होत नाही.
   
 • अनेकवेळा भ्रूणाचा मृत्यू होतो; किंबहुना गर्भपात होण्याची जास्त शक्यता असते

उन्हाळ्यातील प्रजननातील समस्येवर उपाययोजना

 • दुग्धोत्पादन व प्रजनन प्रक्रिया सक्रिय राहण्यासाठी अतिउष्ण वातावरणामध्ये म्हशींची काळजी घेणे गरजेचे असते.
   
 • गोठ्याची मुख्य बाजू उत्तर– दक्षिण दिशेला असावी.
   
 • गोठ्यात पंखे लावणे.
   
 • थंड पाण्याचा फवारा करणे.
   
 • रात्रीच्या वेळेस चारा खाऊ घालणे.
   
 • पिण्याच्या पाण्यात थंड बर्फाचा वापर करणे.
   
 • खाद्यात जीवनसत्त्व अ, ड, ई चा वापर करणे गरजेचे आहे.
   
 • एखादी म्हैस माज दाखवत असेल तर रेतन करावे.
   
 • रेतनानंतर पाठीवर थंड पाणी टाकावे व हिरवा चारा उपलब्ध असेल तर खाण्यास द्यावा.

प्रजननकार्यात अडथळ्यांची आधुनिक निदानपद्धती

 • अल्ट्रासाउंड चाचण्यांद्वारे निदान– स्त्रीबीज व गर्भाची तपासणी करणे
   
 • योनी मार्गातील चिकट स्राव तपासणी करणे – फर्न व स्पिन्बार्केट चाचणी
   
 • गर्भाशयातील स्रावाची चाचणी करणे - व्हाइट साइड चाचणी,
   
 • गर्भाशयाच्या आवरणाची चाचणी
   
 • प्रतिजैविकाची चाचणी करणे,
   
 • संप्रेरकाची चाचणी करणे

प्रजननक्षमता वाढविण्याकरिता वेगवेगळ्या आधुनिक उपचारपद्धती

 • सद्यःस्थितीत पशुप्रजनन शास्त्रात बरेच संशोधन झालेले आहे. या अनेक आधुनिक उपचार पद्धतीचा वापर प्रजननक्षमता वाढविण्याकरिता केला जातो.
   
 • एकत्रित माजपद्धतीचा वापर
   
 • एकाच वेळी अनेक म्हशी माजावर येणे
   
 • कृत्रिम रेतन
   
 • भ्रूणप्रत्यारोपण
   
 • बाह्य प्रणालीचा वापर करून फलन क्रिया करणे
   
 • विशिष्ट लिंगाचे वासरे तयार करणे (मादी किंवा नर वासरे)
   
 • क्लोनिंग
   
 • ईमुनोमोडुलेट्रस व सोबत इतर संप्रेरकाचा वापर.

संपर्क ः डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६
(पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
फायदेशीर पशुपालनाचे तंत्रगाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे...
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापरआपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा...
स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्तादुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक...
अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि...
दुधातील फॅट कमी राहण्याची कारणे,...दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने...
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन...स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि...
उन्हाळ्यातील जनावरांच्या प्रजनन समस्याउन्हाळ्यात जनावरे चारा कमी व पाणी जास्त पितात....
जनावरातील गोचीड नियंत्रणउन्हाळ्यात जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात गोचीडांचा...
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया...उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही...
ओळख पशू संस्थांची...पुण्यश्‍लोक...पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी...
पशुप्रजननातील संभाव्य अडथळे ओळखाप्रजनन व्यवस्थापनात ऋतुमानानुसार, तांत्रिक...
जाणून घ्या कमी अंडी उत्पादनाची कारणे,...देशी कोंबड्यांचे अंडी उत्पादन मुळातच कमी असते आणि...
दुधाळ जनावरांचे उन्हाळ्यातील आहार...नैसर्गिक आपत्ती नियोजन व व्यवस्थापनाबद्दलची...
जनावरांतील मायांग बाहेर येण्याची समस्याम्हशीमधील मायांग बाहेर येण्याचे प्रमाण इतर बाकी...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...