agriculture news in Marathi second corona waive will be tsunami Maharashtra | Agrowon

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल : मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका. गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका. गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर कोरोनाची दुसरी लाट आली तर ती त्सुनामी ठरू शकते, अशी भीती व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.२२) राज्यातील जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन केले.

अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. दिल्लीत गंभीर स्थिती आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील, याची जाणीव मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.२२) रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सरकारने सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरा, अंतर नियम पाळा आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले...

  • यापुढेही संयम दाखवावा लागेल
  • देशातील काही शहरांत रात्रीचा कर्फ्यू 
  • लस आल्यानंतर ती कशी द्यायची हे अद्याप अधांतरीच
  • साडे बारा कोटी जनतेला लस द्यावी लागणार
  • पहिला डोस त्यानंतर बुस्टर डोस द्यावे लागणार
  • पोस्ट कोविडचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहेत
  • जनतेने आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे

इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...