मालेगावात कोरोनाचा दुसरा बळी

मालेगाव, जि. नाशिक: शहरातील नयापुरा भागातील २२ वर्षीय तरुणीचे शनिवारी (ता.११) सकाळी धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
मालेगावात कोरोनाचा दुसरा बळी
मालेगावात कोरोनाचा दुसरा बळी

मालेगाव, जि. नाशिक : शहरातील नयापुरा भागातील २२ वर्षीय तरुणीचे शनिवारी (ता.११) सकाळी धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. या तरुणीच्या निधनामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या दोन झाली असून शहरातील एकूण नऊ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महापालिकेने नयापुरासह कोरोना संशयित रुग्ण असलेले सात क्षेत्र कंटेनमेंट घोषित केले आहेत. शहरात १४ एप्रिलपर्यंत पुर्णत: संचारबंदी (कर्फ्यु) लागू करण्याचा आदेश प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी काढला आहे. नयापूरा भागातील या तरूणीला हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. ७ एप्रिलला तिला येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर ९ एप्रिलला तिला धुळे रूग्णालयात हलविण्यात आले. कोरोनाची लक्षणे असल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला. १० एप्रिलला ही तरूणी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. आज पहाटे सव्वासहाच्या सुमारास तिचे निधन झाले. नयापूरा भागात यापूर्वी एक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने हे क्षेत्र यापूर्वीच कंटेनमेंट घोषीत करण्यात आले आहे. येथील बडा कब्रस्तानात आज दुपारी मोजके नातेवाईक व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या तरुणीचा दफनविधी पार पडला. धुळे येथे उपचार सुरू असतांना या तरुणीचे आई-वडील तिच्या समवेत होते. या दोघांसह कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.

शहरात नियंत्रण कक्ष; वॉर रुम कार्यान्वित शहराच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ (संचारबंदी) लागू झाल्यानंतर या कालावधीतील नागरिकांच्या अडचणी, शंका निरसन होण्यासाठी नियंत्रण कक्ष, वार रुम कार्यान्वित करण्यात आले आहे. २४ तास त्याचे कामकाज सुरु असून यात प्रत्येकी तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. पथक क्रमांक १ सकाळी नऊ ते रात्री नऊ तर दुसरे पथक रात्री नऊ ते सकाळी नऊपर्यंत कार्यरत असेल. या पथकात मंडल अधिकारी एल. एन. निकम (७७९८५६१२७४), जमादार देविदास ठोके (०२५५४-२३१०००), लिपीक कल्पेश महाले (९५७९९६३८२५), मंडल अधिकारी एस. डी. काळे (७५८८१७३६०८), जमादार गौतम उन्हवणे (०२५५४-२३१५५१), लिपीक कल्पेश साळुंखे (७४९८४५४०३६) यांचा समावेश आहे. हे पथक पोलिस नियंत्रण कक्षातून कामकाज करेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com