ताकारी योजनेच्या दुसऱ्या वितरिकेची चाचणी लवकरच

तांत्रिक अडचणीमुळे चाचणी झाली नाही. आता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. ही चाचणी लवकर होणार असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
The second distribution of the Takari scheme will be tested soon
The second distribution of the Takari scheme will be tested soon

देवराष्ट्रे, जि. सांगली ः ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक २ चे काम पूर्ण झाले आहे. योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाल्यावर चाचणी होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे चाचणी झाली नाही. आता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. ही चाचणी लवकर होणार असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

कडेगाव तालुक्‍यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्‍यातील जधावनगर, बलवडी तसेच पलूस तालुक्‍यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत, पलूस व आंधळी आदी गावांच्या २ हजार ४०४ हेक्‍टर लाभक्षेत्राला बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासाठी ११ कोटी ८२ लाख इतक्‍या खर्चाच्या या वितरिकेचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

बंदिस्त पाइपलाइनद्वारे ९ किमी लांबीची मुख्य वितरिका व १६ किमी लांबीच्या उपवितरिकेद्वारे पाणी दिले जाणार आहे. मुख्य वितरिकेला जोडलेल्या उपवितरिकाद्वारे लाभक्षेत्रातील ८ गावांमधील २८ ठिकाणच्या शिवारात जागोजागी चेंबरद्वारे ८० ते १०० हेक्‍टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. या वितरिकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान लाभले आहे. माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी या वितरिकेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न केले होते. आमदार अरुण लाड तसेच श्रीकांत लाड यांनी धडक मोर्चा काढला होता. आमदार मोहनराव कदम व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी या कामाचा आढावा घेतला होता. खासदार संजय पाटील यांनीही लक्ष दिले होते.

योग्य भरपाई नाही यामुळे भूसंपादनाचा विषयच राहिला नाही. बंदिस्त पाइपलाइनसाठी खोदाई करताना होणारी शेतकऱ्यांची पीक व अन्य नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या योग्य नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com