agriculture news in Marathi second installment of FRP paid bu AJINKYATARA Maharashtra | Agrowon

‘अजिंक्यतारा’कडून एफआरपीचा दुसरा हप्ता खात्यात वर्ग 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

अजिंक्यतारा साखर कारखान्याने ३१ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन १५० रूपयाप्रमाणे ऊस पेमेंट संबंधीत शेतकऱ्यांचे बँक खाती वर्ग केले, असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. 

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा देत अजिंक्यतारा साखर कारखान्याने ३१ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन १५० रूपयाप्रमाणे ऊस पेमेंट संबंधीत शेतकऱ्यांचे बँक खाती वर्ग केले, असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. 

अजिंक्यतारा कारखान्याचा चालू गळीत हंगाम अंतीम टप्यात असून या हंगामाकरिता केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या सूत्रानुसार एफआरपी प्रतिटन २७९० रूपये जाहिर केली आहे. या वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल प्रतिटन २५०० रूपयांप्रमाणे १५ एप्रिलपर्यंत संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. तसेच दुसऱ्या हप्तापोटी ३१ मार्चपर्यंत एकूण चार लाख ९५ हजार ५३० टन गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन १५० रूपयांप्रमाणे एकूण ७ कोटी ४३ लाख ३० हजार १२ रूपये पेमेंट मंगळवारी (ता. २२) संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

आमदार भोसले म्हणाले, कि मागील वर्षीसुध्दा ऊसाचे पेमेंट वेळेत आदा केल्यामुळे साखर आयुक्तांनी पत्राद्वारे संचालक मंडळाचे अभिनंदन करून कौतुक केले होते. याही हंगामात सुध्दा एफआरपीप्रमाणे उर्वरित देय पेमेंट लवकरच आदा करण्यासाठी तसे आर्थिक नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. 

‘‘कारखान्याने आत्तापर्यंत ५ लाख ७७ हजार ३५० टनाचे गाळप करून सरासरी १२.४९ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख १७ हजार ७९० क्विंटल साखर उत्पादित केली असून कारखान्याचा गळीत हंगाम अंतीम टप्प्यात आहे. अद्यापही कारखान्याकडे ४० हजार टन ऊस शिल्लक असून एप्रिलअखेर गाळप पूर्ण होईल. म्हणजेच या हंगामात अंदाजे एकूण ६ लाख १० हजार टनाचे गाळप पूर्ण होईल,’’ असे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सांगितले.  

 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...