दुसरा टप्पा जाहीर, २१.२८ लाख शेतकऱ्यांना १४ हजार कोटींची कर्जमाफी
दुसरा टप्पा जाहीर, २१.२८ लाख शेतकऱ्यांना १४ हजार कोटींची कर्जमाफी

दुसरा टप्पा जाहीर, २१.२८ लाख शेतकऱ्यांना १४ हजार कोटींची कर्जमाफी

मुंबई  :महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाचा दुसरा टप्पा शनिवारी (ता.२९) राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. यात २८ जिल्ह्यातील २१.२८ लाख शेतकऱ्यांना १४ हजार कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे सहा जिल्हे संपूर्ण, तर १३ जिल्ह्यांतील काही भागातील कर्जमाफीनंतर जाहीर होणार आहे.  

अशी आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ ची माहिती १.  एकूण अपेक्षित कर्जखती  ३६.४५ लाख २. पोर्टलवर अपलोड झालेल्या खात्यांची संख्या = ३४.९८ लाख खाती ३. यादी प्रसिध्द केलेल्या खात्यांची GB संख्या = २१.८२ लाख खाती, त्यासाठी लागणारी रक्कम रु १४,००० कोटी ४.  शासनाने यासाठी  तरतूद केली आहे. ५. संपूर्ण यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या = १५  ६. ग्रामपंचायत निवडणूक आचरसंहिता लागू असल्याने अंशतः यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या = १३ ७. ग्रामपंचायत निवडणूक आचरसंहिता लागू असल्याने यादी प्रसिद्ध न केलेल्या जिल्ह्याची संख्या = ६  ८.आत्तापर्यंत प्रमाणीकरण झालेले कर्जखाती=७२,९४७ ९.प्रमाणीकरण नंतर व्यापारी बँका २४ तासांमध्ये व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ७२ तासांमध्ये संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यावर लाभ देणार आहेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com