Agriculture news in marathi second positive patient of 'corona' in Ratnagiri | Agrowon

रत्नागिरीत ‘कोरोना’चा दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

रत्नागिरी : रत्नागिरीत दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला आहे. रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात मुंबईतून आलेली एक व्यक्ती दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी झाली होती.

रत्नागिरी : रत्नागिरीत दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला आहे. रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात मुंबईतून आलेली एक व्यक्ती दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी झाली होती. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर राजीवडा परिसर सील करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. 

या संदर्भातील माहिती देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे आदी उपस्थित होते. 

राजीवडा येथील पॉझिटीव्ह व्यक्ती १७ मार्चला कोचीवल्ली एक्स्प्रेसने मुंबईहून रत्नागिरीत दाखल झाली. त्यापूर्वी दिल्लीतील मरकजमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरीत आल्यानंतर ते राजीवडा येथील मशिदीत चार सहकाऱ्यांसह वास्तव्याला होते. त्या व्यक्तीबरोबर कोकण रेल्वेतून आलेल्यांपैकी १० जण चिपळूण, १७ जण रत्नागिरी तर, २४ जण सिंधुदुर्ग स्थानकावर उतरले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या व्यक्तींची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी त्या व्यक्तीला राजीवडा येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. 

राजीवडा परिसरातील तीन किलोमीटरचा भाग सील करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. या परिसरात पालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे. दिल्ली, मुंबई ते रत्नागिरी या रेल्वे प्रवासात ती व्यक्ती कुठे थांबली, याचा शोध सुरु आहे. 

दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमधील रत्नागिरीतील ११ जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरितांचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

गेल्या दहा दिवसांमध्ये मृत झालेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या मृत्यूची कारणेही शोधण्यात येतील. विविध जमातींचे लोक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यात मुंबईतून सात, नवी मुबंईतून १७, जामा मशिदीतून १४, डोंगरीपाडा येथून १२ लोक आले आहेत. दिल्लीतूनही लोक फेब्रुवारीत रत्नागिरीत आले होते. बाहेरून आलेल्या लोकांनी माहिती लपविल्यास त्यांची गय करणार नाही, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिला. 
 


इतर बातम्या
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...