agriculture news in Marathi, second stage election on Thursday, Maharashtra | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघात अंतिम टप्प्यात प्रचाराचा ज्वर वाढला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 एप्रिल 2019

नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचारासाठी शेवटचे दिवस राहिले आहेत. उन्हाचा पारा चढत असताना अंतिम टप्प्यात प्रचाराचा ज्वर वाढला आहे. प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत दुष्काळ, पाणीटंचाई यासह रस्ते, पाणी, सिंचन, वीज या आजवर मार्गी न लागलेल्या प्रश्नांचा मात्र त्रोटक उल्लेख केला जात आहे. उन्हामुळे प्रचार सभांना अपेक्षित गर्दी होत नसल्याने समाज माध्यमावरील प्रचारावर भर दिला जात आहे.

नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचारासाठी शेवटचे दिवस राहिले आहेत. उन्हाचा पारा चढत असताना अंतिम टप्प्यात प्रचाराचा ज्वर वाढला आहे. प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत दुष्काळ, पाणीटंचाई यासह रस्ते, पाणी, सिंचन, वीज या आजवर मार्गी न लागलेल्या प्रश्नांचा मात्र त्रोटक उल्लेख केला जात आहे. उन्हामुळे प्रचार सभांना अपेक्षित गर्दी होत नसल्याने समाज माध्यमावरील प्रचारावर भर दिला जात आहे.

लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघात गुरुवारी (ता. १८) मतदान होणार असल्याने जाहीर प्रचार मंगळवारी (ता. १६) सायंकाळ पर्यंत सुरू राहणार आहे. या तीनही मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत होणार असली तरी वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक ठरणार आहेत. नांदेड, हिंगोलीच्या जागा राखण्याचे काॅँग्रेसपुढे तर परभणीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे.

नांदेड मतदारसंघात काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आजवर एकाकी झुंज देत आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. चव्हाण यांच्या प्रचारार्थ काॅँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे.

परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे संजय जाधव यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे यांच्या सभा झाल्या. सोमवारी (ता. १५) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काॅँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांच्या सभा झाल्या.

हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पकंजा मुंडे, युवासेनेचे आदित्य ठाकरे यांच्या तर काॅँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ धनजंय मुंडे, राजीव सातव यांच्या सभा झाल्या. वंचित बहुजन आघाडीच्या उमदेवारांसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. अन्य उमेदवार रोडशो, प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊन प्रचार करत आहेत. या तीन मतदारसंघात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यासह सिंचन, उद्योग विकासाचा अनुशेष कायम आहे. अनेक बाबतीत मागास असलेल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस आश्वासनाचा अभाव प्रचारात दिसत आहे.

व्यक्‍तिगत आरोप-प्रत्योराप, उणी-दुणी काढली जात असल्यामुळे थोडावेळ मनोरंजन होत आहे. यातून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, महिला यांचे प्रश्न बाजूला राहात असल्याने भ्रमनिराश होत आहे. उन्हामुळे मतदारांची गर्दी होत नसल्याने सकाळी-सायंकाळी प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. समाज माध्यमावरून सभांचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. त्यामुळे घरबसल्या सभा ऐकता येत आहेत. शेवटच्या दोन दिवसात प्रचारातील रंगत वाढणार आहे.

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...