कडकनाथप्रकरणी अंबकच्या दुसऱ्या संशयितालाही अटक

कडकनाथ
कडकनाथ

इस्लामपूर, जि. सांगली ः कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला कंपनीचा संचालक संशयित संदीप सुभाष मोहिते (मोहिते वडगाव, ता. कडेगाव) याला रविवारी (ता. १) न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. दरम्यान, याच प्रकरणातील दुसरा संशयित हनुमंत शंकर जगदाळे (अंबक, ता. कडेगाव) यालाही पोलिसांनी अटक केली.  याबाबतची माहिती अशी, की येथील रयत ॲग्रो इंडिया प्रा. लि. व महारयत ॲग्रो इंडिया प्रा. लि. या कंपनीचा अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते व संचालक संदीप सुभाष मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, सीईओ विनय ज्ञानदेव शेंडे, गणेश हौसेराव शेवाळे यांनी संगनमताने तानाजी निवृत्ती कदम (पेठ) व त्यांचा मुलगा सुदर्शनसह इतर शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात होणाऱ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून तानाजी कदम यांच्याकडून १ लाख ९१ हजार ५०० रुपये व मुलाकडून २ लाख ८ हजार ५०० रुपये व इतर शेतकऱ्यांकडून ४ कोटी ५६ लाख ४२ हजार ५०० रुपये रयत ॲग्रो इंडिया लिमिटेड व महारयत ॲग्रो इंडिया लिमिटेड या कंपनीद्वारे गुंतवणूक करून घेतली. त्यांनी करारातील कोणत्याही अटीचे पालन न करता शेतकऱ्यांना पैसे परत देण्याची खोटे आश्वासन देऊन ४ कोटी ६० लाख ४२ हजार ५०० रुपयांचा गैरव्यवहार करून तानाजी कदम व इतर शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.  रयत ॲग्रो व महारयत ॲग्रो कंपनीच्या लोकांनी राज्यासह परराज्यांतील २०४ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तानाजी कदम यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी संदीप मोहितेला अटक केली होती. त्याला न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. याच प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी हनुमंत जगदाळे यालाही पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली.  कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या साखळीची व्याप्ती आंतरराज्य असल्याचे उघडकीस आले. छत्तीसगड येथील दोन तरुणांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. निलू घोष (रा. विलासपूर) आणि पवनकुमार साहू (दुर्ग बिलाई) अशी त्यांची नावे आहेत. आपण कसे फसलो, याचा उलगडा त्यांनी केला. पोलिसांचे पथक पुण्याला  संपूर्ण राज्यात विस्तार असलेल्या कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्याप्रकरणी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात तपासासाठी रविवारी इस्लामपूर पोलिसांचे एक पथक रवाना झाले. तपासणी करून ते कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.  कर्मचाऱ्यांची कसून चौकशी  कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्याप्रकरणी इस्लामपूर येथील रयत ॲग्रो कंपनीच्या कार्यालयातील संशयितांकडे काम करणारे कामगार वसीम इबुशे, दमामे, हर्षद पाटील, प्रीतम माने, जितेंद्र पाटील, मुरगेश कदम यांच्याकडे इस्लामपूर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com