दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती तांदळास बसला आहे. नोव्हेंबरमध्ये वाढलेली बासमती तांदळाची मागणी परत कमी झाली. यामुळे दरात ही घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत बासमतीचे दर क्विंटलला १००० ते १५०० रुपयांनी कमी झाले आहेत.
The second wave hit the basmati rice
The second wave hit the basmati rice

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती तांदळास बसला आहे. नोव्हेंबरमध्ये वाढलेली बासमती तांदळाची मागणी परत कमी झाली. यामुळे दरात ही घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत बासमतीचे दर क्विंटलला १००० ते १५०० रुपयांनी कमी झाले आहेत. 

जगात प्रसिद्ध असलेल्या भारतीय बासमतीचे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच ते सहा वर्षांत बासमतीचे प्रकार बदलले आहेत. मूळ पारंपरिक (ट्रॅडिशनल) बासमतीचे रूपांतर आता ११२१, १५०९, १४०१ अशा हायब्रीड बासमतीमध्ये झाले आहे. आणि बऱ्याच वर्षांत पारंपरिक बासमतीचे उत्पादन कमी होऊन या हायब्रीड बासमतीचे उत्पादन वाढले आहे. त्याचे कारण म्हणजे आपल्या देशात तसेच परदेशात याला मागणी वाढली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून आपल्या देशातून सर्व प्रकारची बासमती मिळून ४० ते ४५ लाख टन निर्यात होत आहे. 

गेल्या वर्षी कोरोना होता तरी देखील परदेशातून चांगली मागणी असल्याने गेल्या आर्थिक वर्षात पण सुमारे ४५ लाख टन बासमती निर्यात झाली. बासमती तांदळाचे दर हे त्याच्या संपूर्ण वर्षातील उत्पादन आणि निर्यात यानुसार कमी जास्त होत असतात. २०२०-२१ या आर्थिक वर्षात संपूर्ण वर्ष देशात कोरोना असल्यामुळे बराच काळ लॉकडाउनमध्ये गेला. वर्षाची सुरुवातच लॉकडाउनने झाली. एप्रिलमध्ये कोरोनाची सुरुवात झाली ते साधारणपणे सप्टेंबरमध्ये कमी अधिक प्रमाण होत होते. या काळात हॉटेल, कॅन्टीन, रेस्टोरंट, लग्न कार्य, मोठे समारंभ, छोटे कार्यक्रम संपूर्ण पणे बंद असल्यामुळे बासमतीची मागणी गेल्या वर्षी खूप कमी झाली. 

हंगामाची चांगली सुरुवात, सध्या दराची घसरण  यंदा हंगामाची सुरुवात होतानाच म्हणजे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये नवीन पीक बाजारपेठेत येते. या कालावधीत व्यवहार सुरळीत होत होते. परिणामी, बासमतीचे डिसेंबर २० मध्ये दर चांगले होते. उत्तरेकडे निघालेले दर साधारणपणे ९० ते १०० रुपये प्रति किलो निघाले होते. परंतु मार्च आणि एप्रिल २०२१ मध्ये हॉटेल, रेस्टोरंट, छोटे मोठे समारंभ, कार्यक्रम हे परत बंद झाल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या साथीमुळे बासमती तांदळाची मागणी परत कमी झाली. परिणामी, भावही खाली आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

बासमतीचे दर (प्रति क्विंटल रुपये) 
प्रकार डिसेंबर २०२० एप्रिल २०२१ 
पारंपरिक ९००० ८००० 
१५०९ ८००० ७००० 
११२१ ८५०० ७५०० 

गेल्या वर्षी प्रतिकूल परिस्थिती होती. तरीही मागणी कायम असल्याने बासमती तांदळाच्या हंगामाची यंदा चांगल्या दराने सुरुवात झाली. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. बाजारपेठा पुन्हा बंद होत आहेत. सभा समारंभावरही बंदी आली आहे. मागणी घटली आहे, याचा फटका तांदळाच्या दराला बसला आहे.  - राजेश शहा,  संचालक, जयराज ग्रुप 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com