Agriculture news in marathi The second wave hit the basmati rice | Page 3 ||| Agrowon

दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका 

राजकुमार चौगुले
गुरुवार, 22 एप्रिल 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती तांदळास बसला आहे. नोव्हेंबरमध्ये वाढलेली बासमती तांदळाची मागणी परत कमी झाली. यामुळे दरात ही घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत बासमतीचे दर क्विंटलला १००० ते १५०० रुपयांनी कमी झाले आहेत. 

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती तांदळास बसला आहे. नोव्हेंबरमध्ये वाढलेली बासमती तांदळाची मागणी परत कमी झाली. यामुळे दरात ही घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत बासमतीचे दर क्विंटलला १००० ते १५०० रुपयांनी कमी झाले आहेत. 

जगात प्रसिद्ध असलेल्या भारतीय बासमतीचे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच ते सहा वर्षांत बासमतीचे प्रकार बदलले आहेत. मूळ पारंपरिक (ट्रॅडिशनल) बासमतीचे रूपांतर आता ११२१, १५०९, १४०१ अशा हायब्रीड बासमतीमध्ये झाले आहे. आणि बऱ्याच वर्षांत पारंपरिक बासमतीचे उत्पादन कमी होऊन या हायब्रीड बासमतीचे उत्पादन वाढले आहे. त्याचे कारण म्हणजे आपल्या देशात तसेच परदेशात याला मागणी वाढली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून आपल्या देशातून सर्व प्रकारची बासमती मिळून ४० ते ४५ लाख टन निर्यात होत आहे. 

गेल्या वर्षी कोरोना होता तरी देखील परदेशातून चांगली मागणी असल्याने गेल्या आर्थिक वर्षात पण सुमारे ४५ लाख टन बासमती निर्यात झाली. बासमती तांदळाचे दर हे त्याच्या संपूर्ण वर्षातील उत्पादन आणि निर्यात यानुसार कमी जास्त होत असतात. २०२०-२१ या आर्थिक वर्षात संपूर्ण वर्ष देशात कोरोना असल्यामुळे बराच काळ लॉकडाउनमध्ये गेला. वर्षाची सुरुवातच लॉकडाउनने झाली. एप्रिलमध्ये कोरोनाची सुरुवात झाली ते साधारणपणे सप्टेंबरमध्ये कमी अधिक प्रमाण होत होते. या काळात हॉटेल, कॅन्टीन, रेस्टोरंट, लग्न कार्य, मोठे समारंभ, छोटे कार्यक्रम संपूर्ण पणे बंद असल्यामुळे बासमतीची मागणी गेल्या वर्षी खूप कमी झाली. 

हंगामाची चांगली सुरुवात, सध्या दराची घसरण 
यंदा हंगामाची सुरुवात होतानाच म्हणजे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये नवीन पीक बाजारपेठेत येते. या कालावधीत व्यवहार सुरळीत होत होते. परिणामी, बासमतीचे डिसेंबर २० मध्ये दर चांगले होते. उत्तरेकडे निघालेले दर साधारणपणे ९० ते १०० रुपये प्रति किलो निघाले होते. परंतु मार्च आणि एप्रिल २०२१ मध्ये हॉटेल, रेस्टोरंट, छोटे मोठे समारंभ, कार्यक्रम हे परत बंद झाल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या साथीमुळे बासमती तांदळाची मागणी परत कमी झाली. परिणामी, भावही खाली आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

बासमतीचे दर (प्रति क्विंटल रुपये) 
प्रकार डिसेंबर २०२० एप्रिल २०२१ 
पारंपरिक ९००० ८००० 
१५०९ ८००० ७००० 
११२१ ८५०० ७५०० 

गेल्या वर्षी प्रतिकूल परिस्थिती होती. तरीही मागणी कायम असल्याने बासमती तांदळाच्या हंगामाची यंदा चांगल्या दराने सुरुवात झाली. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. बाजारपेठा पुन्हा बंद होत आहेत. सभा समारंभावरही बंदी आली आहे. मागणी घटली आहे, याचा फटका तांदळाच्या दराला बसला आहे. 
- राजेश शहा, 
संचालक, जयराज ग्रुप 


इतर अॅग्रोमनी
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...